स्वत:चेच स्वत:ला केले नेत्रदान आणि अंधत्व झाले दूर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 21, 2020

स्वत:चेच स्वत:ला केले नेत्रदान आणि अंधत्व झाले दूर

 स्वत:चेच स्वत:ला केले नेत्रदान आणि अंधत्व झाले दूर

अहमदनगरला घडली अद्भूत घटना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः डोळ्यावर (बुबुळावर) टीक पडल्यानंतर येणारे अंधत्वाचे प्रमाण भारतात मोठया प्रमाणात आहे. त्यासाठी कोणीतरी मरणोत्तर नेत्रदान केल्या नंतर हे डोळे काढून नेत्रपेढीकडे जमा करावे लागतात व नंतर कोणा निष्णात डोळयांच्या विशेष सर्जन कडून ही अवघड नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया केल्या नंतर ह्या अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होऊ शकते. दरम्यान 7-8 महीने कोरोनाच्या संकटामुळे मृत झालेल्या व्यक्तिंचे मरणोत्तर नेत्रदान होऊ शकत नसल्यामुळे नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया होऊ शकत नव्हत्या.
सुमारे 2 महिन्यांपूर्वी श्री लक्ष्मणराव बोहरे वय 80 रा. परांडा जिल्हा उस्मानाबाद यांच्या एका डोळयात अपघाताने जखम झाल्यामुळे व त्यात जंतू संसर्ग झाल्यामुळे डोळयात जखम होऊन टीक पडली व दुसरा डोळा अनेक वर्षापासून मेंदूपासून येणारी नस बंद पडल्यामुळे पूर्णपणे अंधत्व आले होते. श्री लक्ष्मणराव त्यांच्या भागात उपचार होत नसल्याने अहमदनगरला साई सूर्य नेत्रसेवा ह्या संस्थेत आले. मरणोत्तर नेत्रदान होत नसल्याने बुबुळ उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना तो जंतू संसर्ग झालेला डोळा काढून टाकणे हाच पर्याय होता. परंतू नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांना एक कल्पना सूचली डोळयाची नस बंद असल्यामुळे डावा डोळा हा अनेक वर्षा पासून पूर्णपणे अंध व निकामी झाला होता पण त्याचे बुबुळ चांगले होते. डॉ. कांकरिया यांनी त्यांच्या डाव्या डोळयाचे बुबुळ काढून उजव्या डोळयावर रोपण केले व त्या डोळयाने त्यांना दिसू लागले. त्यामुळे त्याला व त्यांच्या नातेवाईकांना मोठा आनंद झाला. अशी घटना दुर्मिळ असल्यामुळे व ती यशस्वी झाल्यामुळे अशीही अंधत्वावर मात करता येते. ह्या घटनेचे आखील भारतीय नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. महीपाल सचदेव व आयबँक असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री प्रो. डॉ. जीवन टिटियाल ह्यांनी नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ह्या उपक्रमात डॉ. अनिल सिंग तसेच डॉ. चिन्मय ब्रम्हे व साई सूर्य नेत्रसेवाच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले आहे. ‘स्वत:चेच स्वत:ला नेत्रदान’ अशी जगातील अद्भूत घटना घडली व ती यशस्वी झाली त्यांचे विशेष समाधान लाभल्याचे डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया मानकन्हैय्या नेत्रपेढी तर्फे व्यक्त केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here