जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

 जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार मिळाल्याबद्दल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना नवी दिल्ली येथील महात्मा गांधी हेल्थ फाऊंडेशनचा राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांनी सत्कार केला. यावेळी डॉ. जगधने, डॉ. रामटेके, अतुल थोरात, गणेश कवडे, रतन तुपविहीरे, संजय गायकवाड, अनिल जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. जगधने यांनी जालिंदर बोरुडे यांनी  फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात गरजू रुग्णांची गरज ओळखून मोठ्या धाडसाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व विविध आरोग्य शिबीर घेतले. गरजूंना मोफत चष्मे व औषधांचे वाटप करण्यात आले. तर नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करुन त्याला प्रतिबंध करण्यासाठी आर्सेनिक गोळ्या, मास्क व सॅनीटायझरचे वाटप केले. जालिंदर बोरुडे यांनी टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने अनेक रुग्ण विविध आजाराच्या उपचारापासून वंचित होते. गरजू रुग्णांची परवड होऊ नये, ही जाणीव ठेऊन फिनिक्सने नियमांचे पालन करुन कोरोना काळात विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांनी फिनिक्सच्या माध्यमातून टाळेबंदी काळात जालिंदर बोरुडे यांनी घेतलेल्या आरोग्य शिबीराचे कौतुक करुन, फिनिक्सचे कार्य जवळून पाहिले असून, अवयवदान चळवळीत भरीव कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

No comments:

Post a Comment