युवक हा समाजातील महत्वाचा घटक ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 21, 2020

युवक हा समाजातील महत्वाचा घटक ः आ. जगताप

 युवक हा समाजातील महत्वाचा घटक ः आ. जगताप

अरूणोदय गोशाळेला धनादेशाचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः समाजामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहेत. तरी हे प्रश्न सोडविण्यासाठी युवकांनी पुढे यावे तरूणांनी एकत्र येवून सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास समाजाची प्रगती होण्यास मदत होईल. सण, उत्सव , वाढदिवस साजरे करित असताना सामाजिक बांधिलकी जोपासावी. युवक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्याला योग्य मार्गदर्शन दिल्यास समाज घडला जातो. यासाठी युवकांचे संघटन करणे गरजेचे आहे. अरूणोदय गोशाळा येथे सुमारे 500 गायींचा संभाळ अनेक वर्षा पासून मनिष फुलडहाळे करित आहे. समाजातील विविध दानशूर मदत करतात.  गायीची सेवा करण्याचे काम केल्यास पुण्य लाभते. यासाठी प्रत्येकाने चांगल्या कामासाठी खारीचा वाटा उचलावा.  असे प्रतिपादन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी केले.
अहमदनगर मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, शहर जिल्हा महिला राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्रीमती रेश्मा आठरे, अमित तवले यांच्या वाढदिवसा निमित्त अरूणोदय गोशाळेला मदतीचा धनादेश मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांच्या शुभहस्ते देण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मा.प्रा.श्री.माणिक विधाते, नगरसेवक मा.श्री.विपुल शेटीया, माजी नगरसेवक मा.श्री.मनेष साठे, मा.श्री.मनिष चोपडा, मा.श्री.गणेश गोडाळ , मा.श्री.भाऊ मुदगल, मा.श्री.अतुल कावळे, मा.श्री.मनिष फुलडहाळे, मा.श्री. राजेंद्र आठरे, मा.श्री.भुपेंद्र परदेशी, मा.श्री.अमित पांडुळे,मा.श्री.संभाजी पवार, मा.श्री.राजेश भालेराव आदी उपस्थित होते.
प्रा.मा.श्री.माणिक विधाते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने शहरामध्ये युवकांचे संघटन करून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी व्याख्यान मालेचे आयोजन केले जात आहे. विविध स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून आम्ही करित आहोत असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here