सफाई कर्मचारी महत्वाचा घटक असून त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न मार्गी लावू ः त्र्यंबके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 20, 2020

सफाई कर्मचारी महत्वाचा घटक असून त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न मार्गी लावू ः त्र्यंबके

सफाई कर्मचारी महत्वाचा घटक असून त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न मार्गी लावू ः त्र्यंबके

प्रभाग 2 मधील महिला-पुरुष कामगारांना मिठाईचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सफाई कामगार हा आरोग्याचा अविभाज्य घटक असून, गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या काळातही स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून आपल्या सर्वसामान्यांचे आरोग्य अबाधीत ठेवण्याचे काम करत आहेत. सफाई कर्मचारी आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत आपणही विचार केला पाहिजे. याच उद्देशाने त्यांचीही दिपावली गोड करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

प्रभाग क्र.2 मधील महिला व पुरुष अशा 24 कामगारांना दिपावलीनिमित्त मिठाईचे वाटप साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके बोलत होते. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, उपाध्यक्ष दिपक कुडिया, खजिनदार महेश टाक, बबलू सूर्यवंशी आदि उपस्थित होते.

नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणाले, महानगरपालिका सफाई कामगारांना कामे करतांना इतरांबरोबरच स्वत:ची सुरक्षा करणे गरजेचे आहे. स्वत:च्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष करुन आपली कामे ते प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे कामगारांसंबंधित असणार्या बाबींचा विचार करुन त्यांचे प्रश्न आपण सोडवू, असे आश्वासन दिले.

प्रास्तविकात योगेश पिंपळे यांनी साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासत, समाजपयोगी काम करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सफाई कामगारांना तसेच वर्षभर प्रतिष्ठानला मोलाचे सहकार्य करणार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.

या उपक्रमास सदस्य  प्रविण पाटोळे, सुखदेव कापडे, जितेंद्र टाक, संतोष टाक, सचिन ठोकळ, सचिन खोमणे, निलेश पालवे आदिंनी योगदान दिले.  यावेळी प्रभाग क्र.2 चे सुपरवायझर भारत कंडारे, अश्विन सोनवणे, विशाल घोरपडे, सुरज साठे, राहुल शिंदे, बबई वैराळ, नंदा तागोरिया, वर्षा चांदणे, पुष्पा भालेराव, मारथा पठारे, स्वारथा क्षेत्रे आदि कर्मचारी उपस्थित होते. शेवटी उपक्रमाबद्दल भारत कंडारे यांनी सर्वांचे आभार मानले.




No comments:

Post a Comment