स्वस्त जनऔषधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 20, 2020

स्वस्त जनऔषधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा

 स्वस्त जनऔषधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा

पाचपुते आणि जगताप यांचे आवाहन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या दुर्धर व्याधींवर सर्वत्र उपलब्ध असणारे औषधे सामान्यांना परवडणारे नाहीत. शुभ्रा जनआरोग्यम ही संस्था आपल्याला हे औषधी परवडणार्‍या दरात उपलब्ध करून देत आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप यांनी बेलवंडी येथे अमोल खेडकर यांनी सुरू झालेल्या स्वस्त जनऔषधी सेवेच्या शुभारंभ प्रसंगी केले. 

शुभ्रा जनआरोग्यमचा उदघाटन सोहळा आ.बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप या उभयंताच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी सदाशिव पाचपुते होते. जनआरोग्यमचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब पूलाटे यांनी स्वस्त जनऔषधी विषयी यावेळी विस्तृत माहिती दिली. प्रास्ताविक प्रशांत खेडकर यांनी केले तर आभार अवधुत राऊत यांनी मानले. यावेळी सरपंच संग्राम पवार, नवनाथ खेडकर, माऊली हिरवे, अतुल वाजे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here