ऊर्जा मंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा मनसे जाळणार ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 20, 2020

ऊर्जा मंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा मनसे जाळणार ?

 ऊर्जा मंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा मनसे जाळणार ?

विज बिलाविरोधात भाजपा - मनसे आक्रमक.


मुंबई -
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला राज्य सरकारने वाढीव बिलाचा शॉक दिला. लॉकडाऊन काळात वाढीव वीजबिल आल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  वीजबिल माफीचा निर्णय सोमवारपर्यंत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. 24 नोव्हेंबर रोजी मंगळवारी विदर्भात वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाची पहिली ठिणगी मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी विदर्भातून पडणार आहे. त्यावेळी विदर्भात वाढीव वीजबीलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
वीजबिल माफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातील मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात येणार आहे. राज्यात वाढीव बिलावरुन राजकारण तापले असून भाजप महिला आघाडीने मुंबईतील महावितरणाचे मुख्यालय प्रकाशगडावर मोर्चा आज काढला आहे. पोलिसांकडून मोर्चा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोर्चाच्यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. प्रकाशगडासमोर भाजपचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. आंदोलकांनी गेटवर चढत आत घुसण्याचा प्रयत्न केला.  वीजबीलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातील मनसे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्र्याचा 21 फुटांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात येणार आहे.
राज्यात वाढीव बिलावरुन राजकारण तापले असून भाजप महिला आघाडीने मुंबईतील महावितरणाचे मुख्यालय प्रकाशगडावर मोर्चा आज काढला आहे. पोलिसांकडून मोर्चा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोर्चाच्यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. प्रकाशगडासमोर भाजपचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. आंदोलकांनी गेटवर चढत आत घुसण्याचा प्रयत्न केला.

आमच्या सरकारच्या काळात ऊर्जा विभागाने उत्तम काम केले आहे. त्यामुळे, आमच्या काळात थकबाकी असेल तर त्याचा अर्थ आम्ही गरीबांना सवलत दिली आहेे. वीज बिलावरुन या सरकारने घुमजाव केला असून हा मुद्दा आम्ही निवडणुकीत मांडणार आहोत.

-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

No comments:

Post a Comment