यशस्वीतेसाठी परिस्थिती अडथळा ठरत नाही ः कुलकर्णी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

यशस्वीतेसाठी परिस्थिती अडथळा ठरत नाही ः कुलकर्णी

 यशस्वीतेसाठी परिस्थिती अडथळा ठरत नाही ः कुलकर्णी

अनामप्रेमला शैक्षणिक साहित्याचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः परिस्थितीवर मात करुन जीवनात यशस्वी होणारे अनेक जण आहेत. परिस्थिती ही त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत नाही. परंतु आपण ज्या परिस्थितीतून गेलो, तसे समाजातील इतरही अनेकजण प्रयत्नशील असतात. अशांना आपल्या अनुभव, ज्ञान आणि मदतीचा हात दिल्यास तेही यशस्वी होऊ शकतात. हाच आदर्श अक्षय बहिरवाडे यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे. स्वत: कठोर मेहनतीने उच्च शिक्षण घेऊन आता गरजूंना मोफत मार्गदर्शन करुन त्यांना जीवनात यशस्वी करण्याचे ध्येय बाळगून आहे. अशा युवकांच्या प्रयत्नांमुळे समाज उन्नत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अनामप्रेमचे अजित कुलकर्णी यांनी केले.
ज्ञानज्योत सामाजिक संस्थेच्यावतीने अनामप्रेम येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अक्षय बहिरवाडे, अनामप्रेमचे अजित कुलकर्णी, विशाल भागानगरे, विनायक इंगळे, अनिल हरबा, योगेश गडाप्पा, अंकुश मिसाळ, किरण कुलकर्णी, हर्षद मिसाळ, अमोल सुरसे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here