समाजसेवेची आवड असल्यामुळे निंबळक गणात विकासकामे मार्गी ः प्रा. गाडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

समाजसेवेची आवड असल्यामुळे निंबळक गणात विकासकामे मार्गी ः प्रा. गाडे

 समाजसेवेची आवड असल्यामुळे निंबळक गणात विकासकामे मार्गी ः प्रा. गाडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
निंबळक ः समाज कार्याची आवड असल्यामुळे पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार यांनी निंबळक गणात वयक्तिक लाभाच्या योजना पोहचवण्याचे व त्यांचा लाभ मिळवून देण्याचे दिशादर्शक  काम केले असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शाशीकांत गाडे यांनी केले .  
निंबळक ( ता.नगर ) येथे पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून गणात राबविण्यात आलेल्या विविध कामाचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते . या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य संदिप गुंड,  तालुका प्रमुख राजेंद्र भगत, माजी पंचायत सामती सदस्य माधव भाऊ कोतकर, माऊली आव्हाड, मुरलीधर कोतकर, संजय जाजगे, राजेंद् कोतकर, बी डि. कोतकर, रामदास कोतकर, दत्तू दिवटे, दत्तू अण्णा कोतकर, छबुराव गायकवाड, साहेबराव मदने, अशोक कोरडे, सुभाष खेसे उपस्थित होते
यावेळी गाडे म्हणाले डॉ.पवार यांना सामाजीक कार्याची आवड असल्यामुळे निंबळक गणात पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय योजना पोहचवण्याचे काम केले .डॉ. पवार यांनी निंबळक गणात दोनशे बेंच बसविले,  पथदिवे, जनावरासाठी गोठा, रस्ता मुरुमीकरण,  विविध वैयक्तिक लाभाच्या योजना, शेतकरी व निराधार  लोकांसाठी योजना घरकुल लाभार्थी धनादेश वाटप यावेळी उपास्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पवार म्हणाले चार वर्षाच्या कालावधी मध्ये निंबळक गणातील सर्व गावामध्ये पंचायत समिती च्या माध्यमातून. राबविण्यात आलेल्या योजना पोहचवण्याचे काम केले व त्याचा लाभ मिळवून दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here