भगवानगड परिसर बिबट्याच्या दहशतीखाली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, November 23, 2020

भगवानगड परिसर बिबट्याच्या दहशतीखाली

 भगवानगड परिसर बिबट्याच्या दहशतीखाली


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः
भगवानगड परिसरामध्ये अनेक दिवसापासुन बिबट्या पाहिल्याचा अनेक नागरिकांकडून सांगितले जात होते परंतु वनविभागा कडून दुर्लक्ष केले जात होते. प्रत्यक्षात दोन दिवस पुर्वी  भगवानगड तांडा येथील छबुबाई एकनाथ राठोड वय 45 या महिलेवर शेतात गवत घेत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला  बिबट्याचा हल्ला लक्षात येताच तिच्या  अपंग पतीने हातातल्या काठीने बिबट्यावर उगारली व आरडावरडा  केला म्हणून बिबटया पळून गेला  त्या  घटनेमुळे भगवानगड परिसरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. भगवानगड परिसरातील भाग सार्वात जास्त ऊसतोड मजूर बहुतांशी लोक उसतोड करण्यासाठी गेलेल्या आहेत . घरी. म्हतारे व लहान मुले आहेत बिबट्याची. दहशत खाली आहेत शेतीकडे जाताना नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यात यावे असे शेतकर्‍याकडून सांगण्यात येत आहे. परतू परिसरात बिबटे किती आहेत हेही वनविभागाला सागता येत नाही वनविभागाकडून भगवानतांडा जवळ घटनेच्या जवळ एक पिंजरा लावण्यात आलेला आहे. या पिंजर्‍यात एक बोकड ठेवण्यात आलेला आहे असे वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी सांगण्यात आले आहे.

हा एक पिंजरा पुरेसा नाही आणखीन काही पिंजरे लावण्यात यावे ,व हल्ल्याची घटना वनविभागाने गांभीर्याने घेतली नाही तरी जखमींची विचारपूस करण्यासाठी कोणताही वरिष्ठ अधिकारी फिराकले नाहीत  व जखमींना तात्काळ आर्थिक मदत मिळावी .
संजय कीर्तने
भाजप तालुका उपाध्यक्ष पाथर्डीNo comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here