जामखेडच्या वैभवात राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांचा मानाचा तुरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, November 23, 2020

जामखेडच्या वैभवात राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांचा मानाचा तुरा

 जामखेडच्या वैभवात राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांचा मानाचा तुरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः भारतीय सेनेमध्ये  सतरा महाराष्ट्र बटालियन अ.नगर जामखेड विभागाचे राष्ट्रीय छात्र सेनेच्या पंधरा  विद्यार्थ्याची निवड झाली. या कामगिरीमुळे नक्कीच जामखेडच्या वैभवात भर पडणार आहे.
जामखेडमध्ये सिनिअर डिव्हिजन जामखेड महाविद्यालय जामखेड व जूनियर डिव्हिजन श्री नागेश विद्यालय जामखेड व लना होशिंग विद्यालय जामखेड या राष्ट्रीय छात्र सेनेच्या तुकड्या आहेत.या मध्ये जामखेड महाविद्यालयाचे
महेश बाळासाहेब राऊत, सागर रामचंद्र भोसले,उमेश महादेव अडाले, बाबासाहेब अशोक भागडे, सचिन दत्तात्रय शिंदे, सौरभ सतिश लहाने, स्वप्नील मोहन पारखे, सचिन राजेंद्र निकम, प्रतीक कैलास सुरवसे, प्रवीण सुखदेव डोके, संदीप आबासाहेब डोके, गोकुळ दादासाहेब फाळके, ज्ञानेश्वर त्रिंबक पवार, अमीर मुसा सय्यद, विशाल बापू जरक, हे एनसीसी कॅडेट आर्मी भरतीत निवड  होऊन भारतीय सैन्यामध्ये सेवा देणार आहेत.या पंधरा  कडेट्सची भारतीय सेना दलामध्ये निवड झाली आहे त्या पैकी नऊ कॅडेट्स सी सर्टिफिकेट परीक्षा ऊत्तीर्ण तर सहा कॅडेट्स हे बी सर्टिफिकेट परीक्षा उत्तीर्ण कॅडेट्स आहेत.
एन.सी.सी मध्ये सी,बीआणि ए  सर्टिफिकेट ला अत्यंत असे महत्व आहे. सी सर्टिफिकेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्मी मधील लेखी परीक्षा ही माफ असते तर बी सर्टिफिकेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्मी मधील लेखी परीक्षेत पंधरा अतिरिक्त गुणांचा फायदा होत असतो. व ए प्रमाणातचा आर्मी मध्ये काही पदा साठी पाच गुण अतिरिक्त दिले जातात या गुणांचा फायदा घेऊन जामखेड मधील पंधरा एन.सी.सी कॅडेट्स भारतीय सेना दलामध्ये भरती झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच कॉलेज चे कॅडेट्स भरती होण्या करीता कॅप्टन केळकर गौतम दशरथ, सेकंड ऑफिसर अनिल देडे, आणि थर्ड ऑफिसर मयूर भोसले यांनी अथक परिश्रम व मेहनत घेतली आहे. त्याचा या यशाचे कौतुक व कॅडेट्सचे अभिनंदन जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश फलके, ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, श्री नागेश विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ ढवळे, सतरा महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अहमदनगर चे कमाडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे साहेब, अडम ऑफिसर कर्नल बाली यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment