महेश झांजे यांनी वाचवले हरणाचे प्राण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, November 24, 2020

महेश झांजे यांनी वाचवले हरणाचे प्राण

 महेश झांजे यांनी वाचवले हरणाचे प्राण 


नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टी ः वाहिरा - पुंडी शिवारात पठारावर पाण्याच्या शोधात फिरत असलेले एक पाडस विहिरीत पडले होते प्रगतशिल शेतकरी महेशा झांजे यांनी त्याचे प्राण वाचवले.

भुतदया गायी पशुंचे पालन श्रश्र या न्यायाने प्राणी मात्रांवर दया करा असा उपदेश संत करतात याचीच प्रचिती वाहिरा गावात आली. 

खोल विहिरीत हरणाचे पाडस विहीरीत पडल्याचे दृश्य महेश झांजे व सहकार्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी विहीरीत दोरखंड सोडून खाली पाण्यात उतरले हरणाच्या पाडसाला विहीरीतून वर काढले.या हरणाचे प्राण वाचवण्यासाठी महेश भाऊसाहेब झांजे या प्रगतशिल शेतकरी युवकाने आपला जीव धोक्यात घालून मोठ्या शिताफीने हरणाच्या पाडसाला वाचवले. या धाडसी मदतीमुळे परिसरातुन त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी प्रा. सीताराम झांजे, उद्हयोजक हरी झांजे, वि.वि.का.सोसा चेअरमन भाऊसाहेब झांजे, उपसरपंच सतिषराव आटोळे आदींनी परिश्रम घेतले. हे पाडस वनअधिकारी शिंदे साहेब यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here