ग्रामसेवकास वैतागून मनसे कार्यकर्त्याचे उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

ग्रामसेवकास वैतागून मनसे कार्यकर्त्याचे उपोषण

 ग्रामसेवकास वैतागून मनसे कार्यकर्त्याचे उपोषण

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामपंचायतेचे ग्रामसेवक सुशील शेळके यांच्या मनमानी कारभाराला वैतागून मनसेचे शाखा अध्यक्ष आरकेश गायकवाड यांनी जातेगाव येथील ग्रामपंचायतीच्या समोर अमरण उपोषण सुरू केले होते. अखेर विस्तार अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणकर्ते आरकेश गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ग्रामसेवक शेळके हे कार्यालयात सतत गैरहजर असतात, 14 व्या वित्त आयोगातून गटार व स्मशानभूमीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, दलित वस्तीतील अनेक बोगस कामे केली आहेत, पाणीपुरवठा कडे दुर्लक्ष होत आहे, गावातील पोलवरील बल्प बंद पडले आहेत ते बसवलेले नाहीत, प्रत्येक शौचालय धारकाकडून तीन हजार रुपये घेतले असल्याचाही आरोप जातेगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतचा उतारा काढण्यासाठी तीनशे रुपये पावती न देता घेणे, जागेच्या खरेदीखताची नोंद न लावणे, माहितीच्या अधिकाराचे कागदपत्र न देणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत. ग्रामस्थांनी देखील या तक्रारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी,के, माने यांच्या समोर उपोषण स्थळी मांडल्या होत्या. हे ऐकून अधिकारीही अचंबीत झाले होते. ग्रामसेवकावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका मनसेचे कार्यकर्ते यांनी घेतली होती. परंतु विस्ताराधिकारी माने यांनी उपोषणकर्त्यांना याबाबत सखोल चौकशी करून ग्रामसेवकावर पंधरा दिवसात कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष युवा युवराज ढेरे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव जामकावळे, मनसेचे जामखेड तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, सनी सदाफुले, नाना गायकवाड, पोपट गायकवाड, जातेगावचे  शाखा उपध्यक्ष- शंकर भोसले
शाखा उपाध्यक्ष- घनशाम देशमाने, शाखा सचिव- राहुल पौळ मा. सरपंच नानासाहेब गायकवाड, रेवणनाथ गायकवाड, संजु गायकवाड, बबन गिरी, आशोक गायकवाड, गणेश गायकवाड शिधू मेंबर,शंकर भोसले, राहुल पौळ, वैशिष्ट गायकवाड, दादा गायकवाड, कल्याण गायकवाड, शिवप्रसाद गोसावी, रवी गायकवाड, अनिकेत चव्हाण, राकेश गायकवाड, बापू गायकवाड, गणेश पोळ, हरिष गायकवाड, निरंजन पवर, गौरव पोपले, बालाजी गोसावी, बालाजी काळे, विनोद गायकवाड, शुभम माने, पंकज दिक्षित सह मनसे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here