अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी राहुल उगले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी राहुल उगले

 अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी राहुल उगले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः आज रोजी जामखेड येथील युवा नेतृत्व राहुल भैया उगले यांची जिल्हा युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी राज्याचे महसूमंत्री आणि काँगेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब यांनी निवडीचे पत्र दिले. राहुल उगले च्या निवडीने युवक काँग्रेस ला आता आक्रमक व अभ्यासू अशा युवकास पक्षाने संधी दिली आहे.निवडी वेळी बाळासाहेब थोरात साहेब म्हणाले की राहुल उगले यांचे जिल्हा मध्ये तरुणाचे नेटवर्क चा आता पक्षाला खूप फायदा होईल.जामखेड तालुक्या मध्ये जसे युवकांचे संघटन केले तसेच  संघटन आता त्यांनी जिल्ह्यात करून युवक काँग्रेस जिल्ह्यात करावं असा आशावाद व्यक्त केला.
निवड झाल्या वर राहुल उगले म्हणाले की  जिल्हयात होणार्‍या नगरपरिषद नगरपंचायत व होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस चे सदस्य कसे निवडून येतील असे प्रयत्न करणार आहे. युवक काँग्रेस ची गाव तिथे शाखा,वार्ड तिथे शाखा व घर तिथे झेंडा आणि उंबरा तिथे पक्षा चा कार्यकर्ता हे धोरण करणार आहे.
राहुल उगले यांच्या निवडीचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधिर तांबे,युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, आ.लहू कानडे, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके,कार्याध्यक्ष सचिन गुजर,शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे,जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके,युवक चे महासचिव करण ससाणे,सोमेश्वर दिवटे,निखिल पापदेजा,युवक विधानसभा अध्यक्ष सचिन घुले, जामखेड ता. अध्यक्ष शहाजी राजेभोसले,महिला काँग्रेस ता. अध्यक्षा ज्योतीताई गोलेकर, युवक काँग्रेस ता.अध्यक्ष शिवराजे घुमरे,जिल्हा सचिव सुनील शिंदे, तात्यासाहेब काळे,विशाल डूचे,मंझर भाई सय्यद,कुंडल राळेभात ,अशोक निमोणकर,रवि शिंदे, शहराध्यक्ष जमीर,युवक शहराध्यक्ष विक्रांत अब्दुले,फिरोज पठाण,फैयाज कुरेशी, भागिनाथ उगले,गौतम पवार,बळिराम पवार आदी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी त्याचेअभिनंदन केले व शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here