डोक्यात दगड घालून मजुराने केला गवंड्याचा खून - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

डोक्यात दगड घालून मजुराने केला गवंड्याचा खून

 डोक्यात दगड घालून मजुराने केला गवंड्याचा खून


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः घराचे बांधकाम करण्यासाठी आलेल्या मजुराने गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गवंडी असलेल्या  ईश्वर नवसुपे (वय 27)यांच्या डोक्यात पाहटे दगडी तोड घालून खून केल्याची घटना घडली आहे. आरोपी कांतीलाल काकडे याला आंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील कांतीलाल काकडे (वय 40) ईश्वर नवसुपे (वय 27 वर्ष) हे दोघेही देविनिमगाव येथील वाळके -अनारसे वस्तीवर गोरख पाचारणे यांच्या घरांचे बांधकाम करत होते बुधवारी काम आटपून मजूर आणि गवंडी कामाच्या ठिकाणी झोपले होते.गुरुवारी पहाटेच्या सुमारास साडेसहाच्या दरम्यान मजुराने अचानक गवंडी असलेल्या ईश्वर नवसुपे (वय 27)यांच्या डोक्यात झोपेत असताना दगडी तोड घालून खून केल्याची घटना घडली. तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना त्या आरोपीने. मालकाच्या ईरटीका चार चाकी (एम एच 02,डीजे 25 74) या गाडी वरही दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच आंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे ,पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे ,पोलीस हवालदार राजेंद्र काकडे,पोलीस कर्मचारी चंद्रकांत काळकुटे,गंगाधर ऍग्रो संतोष सोनवणे यांनी भेट देऊन पंचनामा केला. आरोप्याला ताब्यात घेतले. आहे त्यांच्या उपचारासाठी अहमदनगर येथे नेले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केला. याप्रकरणी आंभोरा पोलीस ठाण्यात गोरख पाचारणे यांच्या फिर्यादीवरून खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here