श्रीगोंदा पोलिसांची कारवाई आरोपीला घेतले 48 तासात ताब्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 16, 2020

श्रीगोंदा पोलिसांची कारवाई आरोपीला घेतले 48 तासात ताब्यात

 श्रीगोंदा पोलिसांची कारवाई आरोपीला घेतले 48 तासात ताब्यात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील पोईफाटा येथे छपराजवळ रात्री झोपलेल्या 60वर्षीय वृद्धेचा तोंड दाबून विटाने मारहाण करण्याची धमकी देत अत्याचार करून खून करण्याची धमकी देणार्‍या हॉटेल जिजाई मधील वेटर बंटी विरुद्ध दाखल झालेल्या विनयभंग गुन्ह्याचा तपास वेटर चे पूर्ण नाव पत्ता माहीत नसताना देखील अवघ्या 48 तासात श्रीगोंदा पोलिसांनी छडा लावत नगर रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावून आरोपीला जेरबंद केले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण बिटअंमलदार संदीप पितळे, प्रकाश दंडाडे,दत्ता वाळके यांच्या पथकाने नगर येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या सोमनाथ राऊत ,आकाश साळवे यांच्या मदतीने केली.
याबाबत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिलेली माहिती अशी कि दि. 12ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पोईफाटा येथील फिर्यादी वृद्धा छपर समोरील बाजेवर झोपली असता वेटर बंटी याने विनयभंग केल्याची फिर्याद दाखल झाली यात वेटरचे नाव माहीत नसताना तपास लावणे आव्हानात्मक होते परंतु गुन्ह्याची पद्धत पाहता तपास करताना असाच गुन्हा सुपा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती मिळाली तसेच आरोपी हा नगर रेल्वेस्थानक परिसरातून पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी संदीप पितळे, दंदाडे यांना नगर येथे पाठवत कोतवाली पोलिसांच्या मदतीने 14 ऑक्टोबर रोजी रात्री बंटी याला पकडून त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रितेश म्हस्के वय 24 असल्याचे सांगून तो गजानन कॉलनी,नागापूर एमआयडीसी येथील असून हल्ली पोई फाटा येथील हॉटेल जिजाई येथे राहत असल्याचे सांगितले. दरम्यान रितेश म्हस्के याच्याविरुद्ध 2017 मध्ये देखील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप पितळे हे करत आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here