गुटखा माफिया गजाआड; 14 लाखाचा गुटखा जप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 16, 2020

गुटखा माफिया गजाआड; 14 लाखाचा गुटखा जप्त

 गुटखा माफिया गजाआड; 14 लाखाचा गुटखा जप्त

प्रतिबंधित गुटखाविक्रीवर पोलिस व अन्न सुरक्षा विभागाची कार्यवाही...नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात गुटखाबंदी असताना नगर जिल्ह्यात गुटखा विक्री मोठ्या जोमाने सुरु होती. शहरातील पान टपर्‍यांवर, किराणा दुकानात गुटखा सहज उपलब्ध होत असताना त्यावर कार्यवाही होत नव्हती परंतु श्रीरामपुर मधील गुटखा माफियांवर कार्यवाही झाल्यानंतर नगर मधील गुटखा माफियांकडे पोलीस अन सुरक्षा प्रशासनाने नजरा वळविल्या आहेत.श्रीरामपूर पाठोपाठ नगर शहरातही पोलिसांनी गुटखा विक्रीविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. नगर शहरातील शेरकर गल्लीत छापा टाकून पोलिसांनी सुमारे 11 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी शुभम रमणलाल भळगट (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. तेलीखुंट परिसरातील शेरकर गल्लीत भळगट याने गुटख्याचा मोठा साठा केला होता. आता भळगट याच्या चौकशीतून अवैधरित्या गुटखा विक्रीच्या मोठ्या उद्योगाचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सदर घटनेची हकीकत अशी की, पोलीस उप निरीक्षक एस.एच. सुर्यवंशी नेम. विशेष पथक अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चितळे रोडवर बेकायदा गुटखा विक्री होत आहे. ही बातमी प्राप्त होताच तात्काळ प्रभारी पोलीस अधीक्षक, अहमदनगर मा.डॉ.दत्ताराम राठोड यांचे कानी घालुन आदेशान्वये पोलीस उप निरीक्षक सुर्यवंशी व त्यांचे पथकातील कर्मचारी तसेच इतर पोलीस कर्मचारी यांनी या ठिकाणी छापा घातला. मिळून आलेल्या साठ्यामध्ये हिरापान मसाला, सुगंधी तंबाखु, गोवा 1000, अशा प्रतिबंधीत वस्तुची 7005 लहान मोठी पाकिटे सापडली. या मुद्देमालाची किंमत रुपये 13 लाख 92 हजार 729 रुपये आहे. हिरापानमसाला, 717 तंबाबु, सुगंधी तंबाखू, विना लेवल प्लास्टिक 1/2 किलो शिलवंद पॉकेट, विमल पानमसाला, तुलसीजाफरानी जर्दा, रजनीगंधा पानमसाला, सुप्रीम पानपराग, नजर गुटखा, बाबा 160, आर.एम.डी पानमसाला, एम.सेंटेड तंबाखू, व्ही. बन तंबाखू, राजेश्री पानमसाना इत्यादी गुटखा आढळुन आला. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. शरद मधुकर पवार यांनी तोफखाना पोलीस ठाणे येथे खबर दिली असून तोफांना पो.स्टे. गु.र.नं. 7475/2020 भादवि कलम 188, 272, 273, 328, सह अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26(2)(आय.व्ही.) कलम 27 (3) (डी.), कलम 27 (3) (6), व कलम 30(2) (ए), कलम 3 (1) (22) (आय) व कलम 3 (1) (22) (व्ही.) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.ही कारवाई वरिष्ठांचे आदेशाने विशेष पथकाचे पोलीस उप निरीक्षक एस.एच. सुर्यवंशी व पथकातील कर्मचारी आणि इतर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here