कर्जतमध्ये मोठ्या घडामोडी पहावयास मिळणार ः राऊत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 16, 2020

कर्जतमध्ये मोठ्या घडामोडी पहावयास मिळणार ः राऊत

 कर्जतमध्ये मोठ्या घडामोडी पहावयास मिळणार ः राऊत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जतमध्ये मोठ्या घडामोडी पहावयास मिळणार असून अनेक बाबी समोर येणार आहेत असे मोठे वक्तव्य भाजपा नेते व नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक शहाणे यांच्या दुकानात ते आमच्या प्रतिनिधींशी बोलत होते
कर्जत तालुक्यात आगामी नगरपंचायतच्या पार्श्वभूमीवर चर्चाना व गाठीभेटीना उधाण आले असून अनेक जण विविध ठिकाणी चाचपणी करत आहेत व विविध चर्चामधून आपल्या रणनीती ची दिशा ठरवत आहेत, त्यामुळे कोण कोणाला भेटत आहेत याला विशेष महत्व असून अशा गाठी भेटीवर अनेकाचे लक्ष असून त्यावर चर्चा ही झडत असताना उलट सुलट गणितही मांडली जात आहेत. आज कर्जत येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक शहाणे यांच्या दुकानी जाऊन भाजपाचे नेते व नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी एकत्रित चर्चा केेली, या बैठकीबाबत शहाणे यानी आम्ही सतत भेटत असतो व कुठलीही राजकीय चर्चा नसून औपचारिक गप्पा आहेत असे म्हटले तर सध्या महाविकास आघाडीच्या काळात पूर्वीच्या युतीच्या लोकांची भेट ही ब्रेकिंगच असते असे म्हटल्यानंतर राऊत यांनी आत्ताच काहीही नाही शेवटच्या टप्प्यात तुम्हाला खूप उलट फेर झालेले पहावयास मिळणार असून अनपेक्षित घडामोडी घडणार असल्याचे सांगत आगामी काळात कर्जत नागरपंचायतच्या राजकीय सारिपाटावर कोणते रंग कोण भरणार आहेत याला महत्व येणार आहे.  
    कर्जत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुका विचारात घेता सध्याची राजकीय परिस्थिती अनेक शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात असून जाऊ त्यांनी उलट होण्याच्या केलेल्या वक्तव्याने अशा सर्व शक्यतांना बळकटी मिळत असून राऊत यांचा दिशानिर्देश नेमका कोणाकडे व कसा आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here