शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून कामकाज ः कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 19, 2020

शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून कामकाज ः कर्डिले

 शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून कामकाज ः कर्डिले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः जिल्हा बँक ही साखर कारखानदारांची बँक म्हणून असलेली पूर्वीची ओळख पुसून आपण तिची ओळख शेतकर्‍यांची ओळख करून जिल्हयातील जिरायती शेतकर्‍यांना कर्ज मिळवून करून दिली. जिल्हा सहकारी बँक पक्ष , गट, तट न पाहता सहकारी साखर कारखान्यांना मदत करते कारण कारखान्याला मदत म्हणजे शेतकर्‍यांना मदत असे प्रतिपादन करत अतिवृष्टीमुळे राज्यात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना एकरी 1 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी कर्मयोगी कुंडलीकराव जगताप सहकारी साखर कारखान्याच्या 17 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना केले. कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप यांनी साखर उद्योग अडचणीत असून पुढील 2 वर्षे पुरेल एवढा साखरेचा साठा होणार आहे. मात्र शेतकर्‍यांना आपण वार्‍यावर सोडणार नसून स्वर्गीय कुंडलिक तात्यांचा संघर्षाचा वारसा पुढे चालु ठेऊन मार्ग काढून, सहवीज निर्मिती बरोबरच डिस्टलरी प्रकल्प,इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्नशील असणार आहे. शेतकर्‍यांचे थकीत पेमेंट लवकरच देणार असून त्यांची दिवाळी गोड करतानाच कारखान्यातील कामगारांची दिवाळी देखील बोनस देऊ गोड करणार असल्याचे सांगितले.
     यावेळी आ. संग्राम जगताप, जिल्हा बँकेचेउपाध्यक्ष रामराव वाघ, बाबासाहेब भोस, रावसाहेब वरपे, मनोहर पोटे ,आण्णासाहेब शेलार, संजय जामदार, हरिदास शिर्के, अभिलाष घिगे, बाळासाहेब उगले आदी उपस्थित होते. कर्डीले यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता मात्र त्यांना भाजपचे एकनाथ खडसे यांच्यासह काही आमदार फुटणार असल्याची चर्चा आहे, असे विचारता माझ्या माहितीप्रमाणे कोणी फुटणार नाही असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here