गैरव्यवहार झाकण्यासाठी व्यवहारे यांचा खटाटोप ः शहाणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 19, 2020

गैरव्यवहार झाकण्यासाठी व्यवहारे यांचा खटाटोप ः शहाणे

 गैरव्यवहार झाकण्यासाठी व्यवहारे यांचा खटाटोप ः शहाणे

सैनिक बँक कर्जदार फसवणूक प्रकरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः सैनिक बँक चेअरमन शिवाजी व्यवहारे,व्यवस्थापक संजय कोरडे,अधिकारी संतोष भनगडे यांनी संगनमताने कर्जदारांची फसवणूक केली आहे.सर्व रेकॉर्ड पाहुनच पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. माझावर कशल्याही प्रकारे बँकेला फसवल्याची  तक्रार  किंवा गुन्हा  पारनेर पोलिस व न्यायालयात नाही. मी फसवणूक केली तर मग माझ्यावर गुन्हा का दाखल केला नाही? केवळ  स्वताची प्रतिमा उजाळ होण्यासाठी  व बँकेत केलेले गैरव्यवहारावरील सभासदांचे लक्ष वळवण्यासाठी शिवाजी व्यवहारे,संजय कोरडे, संतोष भनगडे यांचा केविलवाना खटाटोप सुरू आहे असा आरोप पुरुषोत्तम शहाणे यांनी केला आहे. सैनिक बँकेच्या अधिकारी व चेअरमन यांनी पुरुषोत्तम  शहाणे यांच्या मालमत्तेचा लिलाव बनावट करून त्यांची फसवणूक केल्याचा नुकताच  पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शिवाजी व्यवहारे ,संजय कोरडे, संतोष भनगडे यांनी सभासदांमध्ये व खातेदार मध्ये   स्वतःची  प्रतिमा उजळवण्यासाठी फिर्यादि निघाला आरोपी अशी बातमी वृत्तपत्रात दिली .त्यावर पुरुषोत्तम शहाणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की माझ्यावर सैनिक बँकेची न्यायालयात किंवा पोलिसात कसलीही तक्रार नाही.ज्या कोणी व्यक्तिने बनाव केला असेल त्या व्यक्तिबरोबर  बँक अधिकारी यांनी न्यायालयात तडजोड का केली? त्या व्यक्तिने पैशे भरले तर मग बनावट लीलाव का केला,मी फसवणूक केली तर माझ्यावर गुन्हा दाखल का नाही केला असा सवाल पुरुषोत्तम शहाणे यांनी उपस्थित केला आहे.
आमच्या तक्रारीत तथ्य असल्यामुळे  पोलिस निरीक्षकांकडून  तक्रारदार , साक्षीदार ,बँक अधिकारी, पदाधिकारी यांचे वेगवेगळे  लिखित जबाब घेऊन तसा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठिवला गेला. कर्जदाराची, खातेदाराची खरच फसवणूक झाल्याचे रेकॉर्डला खात्री झाल्यावर व सर्व पडताळणी करूनच गुन्हा दाखल केला गेला आहे. एकापाठोपाठ अनेक गैरव्यवहाराच्या मालिका समोर आल्याने व्यवहारे, कोरडे यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.त्यामुळे ते सभासद व पारनेरकरांची दिशाभूल करण्यासाठी तथ्यहीन बातम्या प्रसार माध्यमाना देत आहेत.खोट्या आरोपाची राळ उडवून देऊन, संभ्रमाचे वातावरण निर्माण करायचे व मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करणे ही व्यवहारे,कोरडे यांची कार्यपद्धती  असल्याचे उघड झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here