महापालिकेचे 715 कोटींचे बजेट सादर! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2020

महापालिकेचे 715 कोटींचे बजेट सादर!

सर्व प्रभागांच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न...

 महापालिकेचे 715 कोटींचे बजेट सादर!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील विविध प्रभागात विकासात्मक कामे, अमृत योजना, नगरोत्थान योजना, आर्थिक परिस्थिती कमकुवत असणार्‍यांसाठी घरे. मुलभूत सुविधांचा समावेश असणारे महापालिका 2020-21 चे 715 कोटींचे अंदाजपत्रक मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांचेकडे सादर केले व महापौरांनी आज ते ऑनलाइन महासभेपुढे सादर केले.

सादर झालेल्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रू. 294 कोटी 73 लाख, भांडवली जमा रू. 380 कोटी 01 लाख धरण्यात आले आहे. महसुली उत्पन्नात संकलित करापोटी 34 कोटी, शास्ती पोटी 55 कोटी, संकलित करावर आधारित करापोटी 14 कोटी, जी एस टी अनुदान 95 कोटी 74 लाख व इतर महसुली अनुदान रू. 3 कोटी, गाळा भाडे 3 कोटी, पाणीपट्टी 18 कोटी, मीटरद्वारे पाणीपुरवठ्यापोटी 42 कोटी, संकीर्णे 98 लाख इ. महत्त्वाच्या बाबीसह महसुली खर्च 241 कोटी 76 लाख धरण्यात आला आहे. तसेच भांडवली कामावर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरून रू. 433 कोटी 27 लाख अंदाजीत जमा होणार आहेत.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचाही प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शासन अनुदानातून अमृत योजना, सर्वांसाठी घरे, नगरोत्थान योजना, मूलभूत सोयीसुविधा योजना इ. योजना राबवून सर्व भागांच्या विकासाला चालना देण्यात येणार आहे. वेतन, भत्ते व मानधनावर 121 कोटी, पेन्शन 31 कोटी, पाणीपुरवठा वीज बिल 34 कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल 9 कोटी 50 लाख, शिक्षण मंडळ वर्गणी 3 कोटी 65 लाख, महिला व बालकल्याण योजना 1 कोटी 36 लाख, अपंग पुनर्वसन योजना 1 कोटी 36 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 4 कोटी 07 लाख, मा. सदस्य मानधन 1 कोटी 80 लाख, औषधे व उपकरणे 60 लाख, मा. सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी 5 कोटी 96 लाख, कचरा संकलन व वाहतूक 1 कोटी, पाणीपुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 70 लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 1 कोटी 65 लाख, अशुद्ध पाणी आकार 1 कोटी 75 लाख यासह शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठीच्या निधीची मनपा हिस्साची रक्कम भरणे प्रस्तावित आहे. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, आयुक्त श्री. श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, मुख्यलेखाअधिकारी प्रवीण मानकर, नगर सचिव शहाजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदी उपस्थित होते. सभा ऑनलाइन असल्याने पदाधिकारी, सदस्य व खातेप्रमुख ऑनलाइन होते. बजेट सादर केल्यानंतर महापौरांनी सर्व नगरसेवकांना बजेटवर अभ्यास करण्यास सुचविले आहे. उद्या 1 वाजल्यापासून बजेट वरील चर्चासम चालू होणार आहे.

No comments:

Post a Comment