शहरात आघाडीत बिघाडी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2020

शहरात आघाडीत बिघाडी!

 शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षानंतर, आता काँग्रेस-राष्ट्रवादीचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला

शहरात आघाडीत बिघाडी!



नगरी दवंडी/प्रिंतनिधी (अहमदनगर) ः राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना शहरात मात्र ही आघाडी सतत वादग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. आघाडीची सत्ता येण्यापूर्वी शिवसेना व राष्ट्रवादीत जे वैर होते ते अजूनही संपले नसताना, आता काँग्रेस व राष्ट्रवादीतील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे  व आमदार संग्राम जगताप समर्थक अंकुश मोहिते यांच्यातील किरकोळ बाबींवरून झालेला संघर्ष पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. किरण काळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये आमदार जगतापांवर गुंडगिरीचा आरोप केला आहे, तर मोहिते यांनी काळेंनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली आहे. आघाडीतअधिक बिघाडी झाली असल्याचे दिसून येत आहे.

शनिवारी सायंकाळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि पार्किंगचा ठेकेदार अंकुश मोहिते यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद पोलिस ठाण्यापर्यत पोहचला.पोलीस ठाण्यात किरण काळे यांनी फिर्यादीत संग्राम जगताप यांचा उल्लेख केला.तर पार्किंगचा ठेकेदार अंकुश मोहिते यांनी फिर्यादीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा उल्लेख केला. नगर शहरातील लालटाकी रोड वरील काँग्रेस कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे बैठक संपवून बाहेर आले तेव्हा पार्किंगच्या पैशावरून अंकुश मोहिते व त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने किरण काळे यांना शिवीगाळ करत ‘तू आमच्या संग्रामभैया यांना नडतोस काय ? ‘असे म्हणत ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असे काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे तर दुसरीकडे अंकुश चंद्रकांत मोहिते (राहणार सिद्धार्थनगर) याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किरण काळे यांच्यासह निखिल पापडीया, सूर्यभान दिवटे यांच्यासह अनोळखी व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहरातील स्वास्थ हॉस्पिटलसमोर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उभ्या केलेल्या कारचे पार्किंग शुल्क मागितले तेव्हा किरण काळे यांनी शिवीगाळ करत ‘ मी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत काम करतो, माझ्या डोक्यावर शहरात आघाडीत बिघाडी! आमदार सुधीर तांबे, सत्यजीत तांबे यांचा हात आहे तुला कामाला लावतो ‘असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. किरण काळे यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली असून स्वतःचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यात आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुंडगिरीचे आरोप करत त्यांच्या गुंडांनी मुद्दाम दमदाटी केल्याचे म्हटले आहे. अवघ्या वीस रुपयाच्या पावतीवरून पेटलेल्या या वादाची नगर शहरात चांगलीच चर्चा आहे.

No comments:

Post a Comment