बुथ हॉस्पिटलला अंडी व पाण्याचे बॉक्स भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 16, 2020

बुथ हॉस्पिटलला अंडी व पाण्याचे बॉक्स भेट

 सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक उपक्रम राबविले पाहिजे : लांडे

बुथ हॉस्पिटलला अंडी व पाण्याचे बॉक्स भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सण, उत्सव, वाढदिवस साजरे करत असताना प्रत्येकाने सामाजिक भावना जोपासली पाहिजे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सकारात्मक दृष्टिकोनातून ठेवून समाजामध्ये सामाजिक उपक्रम राबविले पाहिजे. कोरोना संकटाचा काळ हा नागरिकांना भीतीचा व वेदना देणारा काळ ठरला आहे. यावर मात करण्यासाठी रुग्णांना चांगल्या आहराची व आधाराची गरज आहे. या संसर्गजन्य आजारामुळे माणूस माणसापासून लांब गेला आहे. आ. संग्राम जगताप यांनी गेली 8 महिने रात्रंदिवस कोरोना रुग्णांना मदत करण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचारातून आम्ही सर्व युवक प्रेरणा घेऊन समाजामध्ये काम करीत आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी केले.अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुथ हॉस्पिटल कोविड सेंटर येथे अभिजित भिंगारदिवे मित्रपरिवाराच्यावतीने अंडी व पाण्याचे बॉक्स देण्यात आले. यावेळी पै.दत्ता तापकिरे, किरण दाभाडे, पै.सुनिल कदम, सोनू घेमूड, शांताराम खैरनार, किरण गुंजाळ, संतोष ढाकणे, दिनेश जोशी, संतोष भिंगारदिवे, दीपक घोडेकर, सागर मिसाळ, शहजाद खान, शुभम भिंगारदिवे, नितीन कदम, रोहित गोसावी व लंकापती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  यावेळी बोलताना अभिजित भिंगारदिवे म्हणाले की, आजच्या युवकांना समाजाबद्दल आपुलकी निर्माण झाली पाहिजे, संकट काळातील व्यक्तींना मदत केली पाहिजे. बुथ हॉस्पिटलने गेली आठ महिने कोरोना रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन रुग्णांना आनंदाने घरी पाठविले. शहरातील जनतेमध्ये बुथ हॉस्पिटलबद्दल आत्मियता निर्माण झाली आहे. आमचे मित्र संतोष लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वमित्र परिवारांनी अंडी व पाण्याचे बॉक्स देऊन वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment