साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने वृत्तपत्र विक्रेत्यांचा केला गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 16, 2020

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने वृत्तपत्र विक्रेत्यांचा केला गौरव

 वृत्तपत्र विक्रेत्यांचे आयुष्यात महत्वाचे स्थान ः त्र्यंबके

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने वृत्तपत्र विक्रेत्यांचा केला गौरव

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः वृत्तपत्र विक्रेता ते प्रसिद्ध अणुवैज्ञानिक ते देशाचे राष्ट्रपती असा प्रेरणादायी जीवन प्रवास करणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर जन्मदिवस आता वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. आपण झोपेतून उठण्यापूर्वी रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम अविरतपणे विक्रेते करतात. वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
     सावेडी येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने या परिसरात वृत्तपत्र वितरण करणार्या विक्रेत्यांचा श्री.त्र्यंबके यांच्या हस्ते श्री साईबाबांचे चरित्र ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, देवीदास गुडा, विकास मुसळे, महेश पंडित, अमित गाडे, निलेश पालवे, वाजीद शेख आदि उपस्थित होते.
नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणाले, आमच्या सावेडी भागात देखील वृत्तपत्र विक्रेते पाऊस, थंडी, उन, वारा याची तमा न बाळगता काम करताना दिसतात. त्यांचा आजच्या दिवशी सन्मान करुन गौरव करण्याचा मला मान मिळाला. विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. या भावनेतूनच आमच्या प्रतिष्ठानच्यावतीने गौरव केला आहे, असे ते म्हणाले.
        यावेळी योगेश पिंपळे यांनी प्रास्तविकात प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष गणेश गांधी, संजय गोरे, प्रमोद पंतम, शरद बेरड, राहुल लिमये, विजय मते, आनंद कारपुरी, गणेश खुरपे, सागर आकुल आदि विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here