लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे करणार ः आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 16, 2020

लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे करणार ः आ. लंके

 लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे करणार ः आ. लंके

विकासकामांचा आ.लंके यांच्या हस्ते शुभारंभ

आ. लंकेंनी नाकारला सत्कार

तिखोलच्या रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून आमदार लंके यांनी तिखोलकरांचा सत्कार नाकारला व लवकरच या रस्त्याचे भूमिपूजन करील त्याच दिवशी तिखोलकरांचा सत्कार स्वीकारील असे आश्वासीत केले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर  ः पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना महामारीचे गंभीर संकट उभे असतानाही भरघोस असा निधी मतदार संघासाठी उपलब्ध केला आहे.व त्या निधीच्या माध्यमातून मतदार संघातील विविध गावात विकासाची दूरदृष्टी ठेवून समाजोपयोगी योजना व शासकीय निधीचा सदुपयोग करत विकास कामाचा वाढता आलेख तालुक्यात दाखवून दिला आहे. निवडणूकी पुर्वी जनसंवाद यात्रेचे आयोजन करत 19 दिवस घरी न जाता मतदार संघात गावोगावी जात गावातील मुलभुत समस्या जाणून घेत त्यांची सोडवणूक करण्याचा शब्द दिला होता व तोच शब्दपुर्ती सोहळा सप्ताहाचे आयोजन करत 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत मतदार संघात अनेक गावात शब्दपुर्ती सोहळ्याच्या निम्मीताने दिवसभर उद्घाटने करून रात्री तेथेच कोठेतरी मुक्काम करत दुसर्‍या दिवशी सकाळ पासुन दुसर्‍या गावापासुन उद्घाटने चालु करणे हा नवीन पायंडा आ.लंके यांनी चालु केला हा पारनेर नगर मतदार संघात चर्चेचा व कौतुकाचा विषय झाला आहे . गुरुवारी सकाळी डिसकळ येथे 12लक्ष रु. शुभारंभ व 20 लक्ष रु. रत्याचा लोकार्पन, गोरेगाव येथे 20 लक्ष रु दैठणे गुंजाळ येथे 15 लक्ष रुपये, धोत्रे बु॥ येथे 11 लक्ष रुपये, तिखोल येथे 6 लक्ष रुपये भाळवणी येथे 25 लक्ष रुपये व ढवळपुरी येथील 31 लक्ष रुपये असा एकुन 1 करोड 40 लक्ष रु . निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
     माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत मला अडचणीच्या वेळेस खांद्यावर घेऊन मला साथ देणार्‍या मतदार संघातील जनतेने मला आधार दिला त्याचा बॅकलॉक मी येत्या काळात विकासाच्या मार्गाने भरून काढनार आहे.असे आमदार लंके यांनी शुभारंभाच्या जाहीर सभेत जनतेस आश्वासित केले.
यावेळी आ. लंके यांच्या समवेत पारनेर नगर मतदार संघाचे विधानसभा अध्यक्ष अशोकराव सावंत,वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदाम पवार,युवा उद्योजक सुरेश धुरपते, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम कळमकर,महिला अध्यक्ष सुवर्णाताई धाडगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशांत गायकवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, प्रा. लाकुडझोडे सर, पत्रकार शरद झावरे,अभय नांगरे, सत्यम निमसे , बबन घोलप, दादा सुंबे,संभाजी नरसाळे,जालींदर वाबळे,शरद काकडे ,ग.वा. रोहकले,सुकदेव चितळकर,राजू रोडे,विकास भागवत,संदिप ठाणगे, शिवाजीराव ठाणगे, ठाणगे सर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment