कापूस खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना बाजार समितीचे लायसन्स यापुढे सक्तीच - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 23, 2020

कापूस खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना बाजार समितीचे लायसन्स यापुढे सक्तीच

 कापूस  खरेदी  करणार्‍या  व्यापार्‍यांना  बाजार  समितीचे  लायसन्स  यापुढे  सक्तीच

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः   तालुक्यातील  कापूस  खरेदी  करणार्‍या  व्यापार्‍यांना  बाजार  समितीचे  लायसन्स  यापुढे  सक्तीचे  करण्यात आले असून सदर  लायसन्स  कापूस  व्यापार्‍यांनी  आठ  दिवसात  काढून  घेण्याचे  आवाहन  तहसीलदार एफ आर शेख  ह्यांनी  केले. राहुरी तहसील  कार्यालयात तहसीलदार शेख व माजी खासदार  प्रसाद  तनपुरे  यांच्या उपस्थितीत कापूस उत्पादक बैठकीत त्यांनी सांगितले .  कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकर्‍यांची प्रचंड लूट करीत असल्याच्या तक्रारी  माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे  कडे  अनेक  कापूस  उत्पादक  शेतकरी  ह्यांच्याकडे  केल्याने त्याबाबतीत  तहसीलदार ह्यांनी लक्ष  घालावे  अशी  सूचना  केल्याने  तहसीलदार एफ आर शेख यांनी आज  तहसील कार्यालय  येथे कापूस खरेदी व्यापारी  शेतकरी  प्रतिनिधी  सहाय्य्क  निबंधक (सहकार) बाजार  समितीचे  सचिव   ह्यांची  आज  बैठक घेतली.याबैठकीत  स्वतः  तहसीलदार  फसलोद्दीन  शेख  माजी  खासदार  प्रसाद  तनपुरे  सहाय्यक  निबंधक  दिपक  नागरगोजे वजन  काटा  निरीक्षक  सुनिल  चित्ते बाजार  समितीचे  सचिव  प्रकाश  डुक्रे वरिष्ठ  लिपिक मधुकर कोळसे स्वाभिमानी  शेतकरी  संघटनेचे  जिल्हाध्यक्ष  रवी मोरे शेतकरी  प्रतिनिधी सचिन  ठुबे  डॉ  राजेंद्र बानकर  अतुल  तनपुरे आदि  उपस्थित  होते. या  बैठकीतशेतकरी  सांग घटनेचे  पदाधिकारी  कापूस  खरेदीदार  व्यापारी  तसेच  वजन  काटा  निरीक्षक  ह्यांच्यात  जोरदार खडाजंगी होवून सविस्तर  चर्चा झाली. प्रसंगी शाब्दिक हल्लाही करण्यात आला. शेतकर्‍यांनी कापूस खरेदी करणारे व्यापारी वेगवेगळ्या कारणाने शेतकर्‍यांना कमी दर देतात वजनात व क्विंटल मागे तीन किलो घट धरतात यामुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र संतापाची  लाट पसरली होती अनेक शेतकर्‍यांनी प्रसाद तनपुरे यांच्याकडे  तक्रारी  आल्याने  सदर  बैठक  बोलावली  असून  जे  कापूस  खरेदीदार  आहेत  ते  शेतकरी  पण  आहेत त्यांनी  दोन्ही  बाजूचा  बिचार  करुन  शेतकर्‍यांना  न्याय  द्यावा ह्या  भूमिकेतून बैठक  आयोजित  केल्याचे  स्पष्ट  केले.  श्री  तनपुरे  म्हणाले  की शासनाच्या हमीभावापेक्षा ही जवळपास बाराशे ते पंधराशे रुपये कमी मिळत आहे आधीच शेतकरी अतिवृष्टीच्या पावसामुळे संकटात सापडलेला असताना व्यापारीही मनमानी करत लुट करत आहे त्यांचेवरती कोणाचेही नियंत्रण नसल्याने वचक राहिलेला नव्हता ओला कापूस नावाखाली शेतकर्‍यांच्या हातात कमी रक्कम दिली जात होती. चर्चेअंती व्यापारी वर्ग दिलेल्या सूचनांचे  पालन करण्यास तयार झाले गेल्या दोन दिवसापासून राहुरी तालुक्यात कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकर्‍यांना वेठीस धरले गेले होते आजच्या बैठकीस कापूस व्यापार्‍यांना उपस्थित राहण्याचे फर्मान सोडण्यात आलेले होते असे असतानाही अनेक व्यापार्‍यांनी बैठकीकडे पाठ फिरविली त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे तहसीलदार शेख यांनी आदेश दिले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत वजन काटा पावती वरच कापूस खरेदीची सक्ती करण्यात आली शहरातील खाजगी वजन काट्यावर मोठी तफावत आढळून आल्याचे निष्पन्न झाले यापुढे बाजार समितीच्या भूई काट्यावरच वजन करण्यावर एकमत झाले बाजार समितीचे व्यवस्थापनांनी यावर नियंत्रण ठेवण्याचे ठरले चर्चेमध्ये व्यापार्‍यांनी विविध समस्या कथन केल्या एखादा व्यापारी शेतकर्‍यांना लुबाडत असेल तर उर्वरित व्यापारीही संशयाच्या भोवर्‍यात सापडतात त्यासाठी व्यापार्‍यांनीही बंधने घालून घेतली पाहिजेत असे तनपुरे यांनी बैठकीत स्पष्ट केले कापूस उत्पादन घेताना शेतकर्यांना मोठा खर्च आला उत्पादनात घट आली तुलनेत खर्चही निघणे मुश्कील झाले आहे अशा काळात कापूस व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना लुबाडणे हे पाप ठरणारे आहे त्यासाठी व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीत व्यापार करावा असे आवाहनही श्री तनपुरे यांनी केले राहुरी तालुक्यात जवळपास 100 पेक्षा अधिक ठिकाणी कापूस खरेदी करणारे व्यापारी आहेत वजनमाप निरीक्षक सुनील चित्ते यांनी वजन काटा व्यवस्थित आहे की नाही याची तातडीने पडताळणी करून घ्यावी असे आदेश देण्यात आले यावेळी शुक्रवार पासून चर्चेत ठरल्याप्रमाणे अंबलबजावणी करून कापूस खरेदी करण्याचे सर्व संमतीने ठरविण्यात आले. तहसीलदार  शेख  ह्यावेळी  म्हणाले  की  राहुरी तालुक्यात अठरा हजार हेक्टर क्षेत्रावर पीक बाधित झालेले आहे. सुमारे 13 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीचे पीक आहे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले सर्वाधिक क्षेत्र कपाशी लागवडीखालील आहे यावरूनच कपाशी हे पीक महत्वाचे आहे त्यासाठी व्यापार्‍यांनी सूचनांचे पालन करावे असे फर्मान तहसीलदार एफ आर शेख यांनी काढले. यावेळी  कापूस  व्यापारी  प्रतिनिधीनी  आपली  बाजू  मांडली.

    यावेळी बैठकीस ज्ञानेश्वर काळे  सचिन  उदावंत  संदीप  डावखर दिलीप  चोरडिया अतुल  तनपुरे  अनील   डौले  भारत झुगे जितेंद्र  शेळके  साहेबराव  भांड  ईश्वर  सुराणा अण्णासाहेब  ढोकणे  संजय  लांबे  दत्तात्रय  दुशिंग  आदि सह  तालुक्यातील  व्यापारी  उपस्थित  होते. 

No comments:

Post a Comment