सत्य खडसेंना माहित... ते अर्धसत्य बोलत आहेत ः देवेंद्र फडणवीस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 22, 2020

सत्य खडसेंना माहित... ते अर्धसत्य बोलत आहेत ः देवेंद्र फडणवीस

 सत्य खडसेंना माहित... ते अर्धसत्य बोलत आहेत ः देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसेंचे खरे व्हिलन कोण? बहुजन अ‍ॅगल कशासाठी

फडणवीसांनाच खलनायक का बनवल जातंय?

अशा व्यक्तीला तुम्ही राज्यपाल बनविण्याची शिफारस करीत आहात तुमचे डोके फिरले आहे का..?, या शब्दांत तो ‘सर्वोच्च नेता’ भडकला होता! त्या ‘सर्वोच्च नेत्या’ची खडसे यांच्याबद्दलची ही टोकाची तिडीक पाहिल्यानंतरच सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले होते, काहीही झाले तरी (म्हणजे, कितीही राजकीय किंमत मोजायची झाली तरीही) पुनवर्सन अशक्य! किंबहुना खडसेंनी पक्ष सोडला तरी चालेल, असेच दिल्लीतून स्पष्ट केले गेले. आणि झालेही तसेच. अखेरपर्यंत पुनवर्सन झालेच नाही. ना विधानसभेचे तिकीट, ना राज्यसभा, ना विधानपरिषद, ना राज्यपालपद मिळाले. पण त्या ‘सर्वोच्च नेत्या’चे नाव घेण्याची हिंमत न दाखविता खडसे हे केवळ फडणवीसांना टार्गेट करीत आहेत.मुंबई :
माधव (माळी, धनगर, वंजारी) वोट बँक तयार करून महाराष्ट्रात भाजपाच्या भक्कम वोट बँकेला राष्ट्रवादी प्रवेशाने तडा गेला आहे. फडणवीसांना खडसेंद्वारा टारगेट करून ही वोट बँक राष्ट्रवादीकडे ओढण्याचा शरद पवारांचा डाव लपून राहिला नाही. फडणवीसांना खलनायक ठरविण्यामागे पवारांनी जी रणनीती आखली त्याचा फटका भाजपाला निश्चित बसणार आहे.
‘केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजप सोडतो आहे’ असे  एकनाथ खडसे म्हणतात; तर ‘खडसे फक्त अर्धसत्य बोलत आहेत. खरे सत्य त्यांनाही माहित आहे.. त्यांना व्हिलन हवा होता आणि म्हणून ते मला व्हिलन बनवत आहेत, पण काही गोष्टी अशा असतात की जाहीरपणे बोलता येत नाही..’ इति फडणवीस.
फडणवीस म्हणत आहेत, तसे ‘खरे सत्य’ काही वेगळेच आहे काय? खडसेंनी फडणवीसांना व्हिलन ठरविले; पण खरा व्हिलन  दुसराच कोणी तरी आहे. पण त्याचे नाव घेण्याचे धाडस कधी खडसे दाखवू शकले नाहीत? कदाचित फडणवीस म्हणत आहेत तीच वस्तुस्थिती आहे, ज्याची पूर्ण कल्पना खडसे उर्फ नाथाभाऊंना आहे. रिवाइंड टू 2017. जेव्हा चौकशीच्या फेरयातील नाथाभाऊ अस्वस्थतेच्या शिखरावर होते आणि मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांच्याबद्दलचा त्यांचा धीर सुटू पाहत होता. तेव्हा प्रदेश भाजपकडून नाथाभाऊंचे सन्मानजनक पुनवर्सन करण्याचा प्रयत्न सूरू होता. त्यामुळे नाथाभाऊंना एक तर राज्यसभेवर पाठवावे किंवा त्यांना राज्यपाल तरी करावे, असा  प्रस्ताव प्रदेश कोर टीमने तयार केला होता. तो प्रस्ताव घेऊन तत्कालीन प्रदेश संघटन सरचिटणीस रविंद्र भुसारी हे दिल्ली दरबारात गेले होते. त्यांनी हा प्रस्ताव संबंधित वरिष्ठांना सांगितला आणि त्यांची संमतीही घेतली होती.
झुकलो तरी दुर्लक्षच दिल्लीतील अतिशय विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा भुसारी हा प्रस्ताव घेऊन ‘सर्वोच्च नेत्या’ला भेटले, तेव्हा एरव्ही इतरांचे अतिशय शांतपणे ऐकून घेण्याचा लौकिक असलेल्या या ‘सर्वोच्च नेत्या’ने अक्षरशः रूद्रावतार धारण केला. एवढेच नव्हे, तर प्रदेश भाजपने बनविलेल्या त्या प्रस्तावाचे पत्र अक्षरशः भिरकावून दिले. अशा व्यक्तीला तुम्ही राज्यपाल बनविण्याची शिफारस करीत आहात तुमचे डोके फिरले आहे का..?, या शब्दांत तो ‘सर्वोच्च नेता’ भुसारींवर भडकला होता! त्या ‘सर्वोच्च नेत्या’चा हा पवित्रा पाहिल्यानंतरच अतिशय स्पष्ट झाले होते, काहीही झाले तरी (म्हणजे, कितीही राजकीय किंमत मोजायची झाली तरीही) खडसेंचे पुनवर्सन शक्य नाही! आणि झालेही तसेच. त्या घटनेला तीन वर्षे झाली. खडसेंचे शेवटपर्यंत पुनवर्सन झालेच नाही. ना विधानसभेचे तिकीट, ना राज्यसभा, ना विधानपरिषद, ना राज्यपालपद मिळाले. त्यांना नाईलाजास्तव पक्ष सोडावा लागला. जर खरोखरच खडसेंचे पुनवर्सन करायचे असते तर काय अवघड होते? ओबीसी या केवळ एकाच निकषावर राज्यसभेत पोहोचलेले औरंगाबादचे डॉ. भागवत कराड यांच्याऐवजी नाथाभाऊंना सहज राज्यसभेत पाठविता आले असते. विधानपरिषदेतही तीन ओबीसींना संधी मिळाली. तिथेही नाथाभाऊ सहज अ‍ॅडजस्ट होऊ शकले असते. सध्या चार-पाच राज्यपालपदे रिक्त आहेत. राज्यपाल बनवून नाथाभाऊंच्या प्रदीर्घ कारकिर्दीची अखेर सन्मानजनक पद्धतीने करता आली असती. मनात असते तर पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरदेखील पुनवर्सन करता आले असते पण नाथाभाऊंबद्दल ‘सर्वोच्च नेत्या’ची तिडीकच इतकी टोकाची आहे, की सन्मानजनक पुनवर्सन सर्वार्थाने शक्य असूनही नाथाभाऊंकडे पक्षाने पूर्ण दुर्लक्ष केले! किंबहुना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याव्यतिरिक्त एकाही नेत्याने नाथाभाऊंची तोंडदेखलीदेखील साधी विनवणी केली नाही. संघ परिवारातूनही त्यांच्यासाठी फार काही झाले नाही. दिल्लीस्थित सर्वच नेत्यांनी तर त्यांची बोळवण केली. काहींनी तर त्यांना साधी भेटीची वेळसुद्धा दिली नाही. हे सगळे सत्य माहित असूनही नाथाभाऊंनी आजपर्यंत त्या ‘सर्वोच्च नेत्या’बद्दल एकही चकार शब्द काढण्याची हिंमत दाखविली नाही. त्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्याऐवजी फडणवीसांना लक्ष्य करणे नाथाभाऊंनी सोपे वाटले. कारण ‘बहुजन’ असा अँगल दिला की फडणवीसांना सॉफ्ट टार्गेट करणे सोपे असल्याचे नाथाभाऊंना चांगलेच माहित होते.., असे या सूत्राने सांगितले. मुळात खडसे यांच्यासंदर्भातील कोणताही निर्णय फडणवीस यांच्या पातळीवर होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि नाथाभाऊ म्हणतात, त्याप्रमाणे फडणवीस दिल्लीतील नेत्यांची दिशाभूल करत असण्याची शक्यता केवळ पोरकटपणा आहे. कारण दिल्लीतील दोन टॉप नेत्यांची कुणी दिशाभूल करू शकते, यावर शेंबडे पोरदेखील विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे नाथाभाऊ फक्त अर्धसत्य सांगत आहेत, यात काहीच शंका नाही, असे हे सूत्र म्हणाले. आता पक्ष सोडल्यानंतर तरी नाथाभाऊ हे (त्यांच्या दृष्टिकोनातून) खर्‍या व्हिलनचे नाव घेण्याची हिंमत दाखविणार काय, याची उत्सुकता आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here