रयत क्रांती तर्फे बांधावर जागरण गोंधळ आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 23, 2020

रयत क्रांती तर्फे बांधावर जागरण गोंधळ आंदोलन

 अतिवृष्टीचे पंचनामे करून भरपाई मिळण्याकरिता रयत क्रांती तर्फे बांधावर जागरण गोंधळ आंदोलन


श्रीगोंदा प्रतिनिधी : 

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे आस्मानी व सुलतानी संकटामध्ये सापडलेला असून शेतकर्‍यांचा सर्व शेतीमाल उध्वस्त झाला आहे . मागीलवर्षी परतीचा पाऊस त्यानंतर कोरोना महामारी व सध्या सुरू असलेला राज्यभर अतिवृष्टीचा जीवघेणा पाऊस व वादळ यामुळे राज्यातील सर्व शेतकर्‍यांच्या शेतातील पिके खराब होऊन नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचानामे करून भरपाई मिळावी याकरिता रयत क्रांती संघटनाच्या वतीने शिरसगाव बोडखा येथील शेतकरी राजेंद्र आठवे यांच्या बांधावर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. निवासी नायब तहसीलदार सायली नांदे, सर्कल प्रशांत कांबळे, तलाठी हर्षदा पोळ मॅडम , कृषी सहाय्यक नेर्लेकर यांनी आंदोलनं स्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पी.एस.आय पगारे , पोलीस हेड कॉन्स्टेबल कोपनर उपस्थित होते.  रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकर्‍याच्या बांधावर केलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेल्या श्रीगोंद्याच्या निवासी नायब तहसीलदार सायली नांदे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात जिरायत भागातील शेतकर्‍यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये व बागायत व फळबाग शेतकर्‍यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये नुसकान भरपाई मिळावी, चालू वर्षी चे पिक कर्ज माफ करावे , थकबाकीदार शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा, थकीत कर्ज पूर्णपणे माफ करावे, कृषी पंपाचे वीज बिल संपूर्ण करावे अश्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी निवासी नायब तहसीलदार सायली नांदे यांनी बोलताना सांगितले की नुसकान ग्रस्त शेतकर्‍यांचे शेतीचे पंचनामे केले जातील असे आश्वासन दिले.

यावेळी शिरसगाव बोडखा येथील भानुदास सोमवंशी , आठवे गुरुजी , राजेंद्र आठवे , संजय गुणवरे , अमोल उबाळे , संतोष सोमवंशी , बाळासाहेब उबाळे , सुनील गोरे , शिवाजी चौधरी , अमोल गायकवाड , ग्रामपंचायत हंगेवाडी येथील उपसरपंच संतोष काळे , पांडुरंग काळे , बाबासो आठवे , अण्णा साबळे , रामदास काळे , ज्ञानदेव खोमणे , संजय काकडे , वसंत चौगुले , गणेश आठवे, बाळासाहेब आठवे, त्याचप्रमाणे तरुण वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मांड़े यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment