मागासवर्गीय समाजाच्या वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 करा ः उमाप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 15, 2020

मागासवर्गीय समाजाच्या वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 करा ः उमाप

 मागासवर्गीय समाजाच्या वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 करा ः उमाप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय समाजातील वर्ग 2 च्या जमिनी विनामोबदला वर्ग 1 करण्यासाठी मंगळवार दि.13 रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप यांनी श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन दिले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की नोंदवहीत भोगवटादार वर्ग 2 असल्यामुळे बहुतांशी शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.व अनेक प्रकारचे कर्ज घेता येत नाही.सदरील जमिनीचे दस्तऐवज  जामिनकीसाठी स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना त्या जमिनीचा विनिउपयोग करता येत नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अभिलेख आणि नोंदवहीत सात-बारा,भु-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग 2 रद्द करून भोगवटदार वर्ग 1 ची विनामोबदला नोंद करण्यात यावी असे निवेदन त्यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत देण्यासाठी तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांना दिले आहे त्यावेळी सोबत सोमनाथ म्हस्के, मानव जाधव, रोहन ससाणे,विशाल मोरे,लाला गोरे,अक्षय साळवे, गोरख लोखंडे अनिल अडागळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here