सराफी पेढीवर दरोडा टाकणारी टोळी गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 14, 2020

सराफी पेढीवर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

 सराफी पेढीवर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
राहाता ः लोणी (ता. राहाता) येथील सराफी पेढीवर दरोडा टाकणा़र्‍या अट्टल गुन्हेगारांची टोळीला पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यांच्या ताब्यातून 21 किलो 700 ग्रॅम चांदीसह साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
   नवनाथ साहेबराव गोडे (वय 32, रा. सावळीविहीर, ता. राहाता), अतुल चंद्रकांत आमले (वय 24, रा. कर्वेनगर, घोसाळे, जि. पुणे), सागर गोरख मांजरे (वय 23, रा. मातापूर, ता.श्रीरामपूर, हल्ली रा. शिवाजीनगर, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी लोणी गावातील संतोष मधुकर कुलथे हे आपली सराफी पेढी बंद दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागीने दोन पिशव्यांमध्ये भरून घरी जाण्याच्या तयारीत होते. यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी शस्त्राचा धाक दाखवून मोटारीमध्ये ठेवलेल्या सोने-चांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी लोणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे व लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांची पथके तयार करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तपासादरम्यान आरोपी पुणे जिह्यातील शिरूर येथे लपल्याची माहिती माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शिरूरमधून आरोपींना ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here