दहिवाळकर ज्वेलर्सतर्फे नेवासा फाटा येथे रिक्षाचालकांना मास्क वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 15, 2020

दहिवाळकर ज्वेलर्सतर्फे नेवासा फाटा येथे रिक्षाचालकांना मास्क वाटप

 दहिवाळकर ज्वेलर्सतर्फे नेवासा फाटा येथे रिक्षाचालकांना मास्क वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा फाटा येथील प्रतिष्ठित सोन्या चांदीचे दागिन्यांचे व्यापारी विजय दहिवाळकर यांचे तर्फे आज नेवासा फाटा ते नेवासा मार्गांवर चालणार्‍या रिक्षा चालकांना मास्क वाटप करण्यात आले.
नेहमीच गोर गरीब लोकांसाठी अहोरात्र झटनारे आणि डी एस नावाने प्रसिद्ध असणारे दहिवाळकर यांनी रिक्षा चालकांबद्दल आणि त्यांच्या आरोग्याविषयी काळजी घेतल्याने नेवासा परिसरात सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात आले.यावेळी रिक्षा संघटनेचे दिनेश व्यवहारे,कुंडलिक लश्करे,दिनेश लश्करे,अब्दुल शेख,अशोक बुगडे,अनिल गायकवाड,बालमभाइ,सचिन नेमाने,पप्पू डहाळे,आदी.रिक्षा चालकांनी मास्क स्वीकारून दहिवाळकर यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment