किक बॉक्सिंगला मान्यता नसल्याची शेलार यांची खंत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 20, 2020

किक बॉक्सिंगला मान्यता नसल्याची शेलार यांची खंत

 किक बॉक्सिंगला मान्यता नसल्याची शेलार यांची खंत

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः किक बॉक्सिंग या खेळायला मान्यता नसल्याची खंत,आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश शेलार यांनी व्यक्त केली असून ते म्हणाले की  एक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होताना त्याची भरपूर मेहनत तसेच त्याच्या गुरुवर्य व त्याच्या परिवाराची व मित्रपरिवार यांच्या कडून प्रोत्साहनामुळे त्याच्या गुणवत्तेचा वाढता आलेख सतत वाढत असतो.... पण... हा खेळाडू काही उपरे व विकृत वृत्तीच्या लोकांमुळे त्यांच्या मेहनतीची फळे ते उपभोगू शकत नाहीत. क्रीडा विभागामध्ये बोगस प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेत शिरकाव केलेल्या बोगस क्रीडापटूंवर महाराष्ट्र शासन वेळोवेळी कारवाई कारत असते. ज्या खेळांना 5% आरक्षणासाठी मान्यता आहे, आणि याच खेळांचे बोगस प्रमाणपत्र घेऊन आज हे बोगस क्रीडापटू नोकरी करत आहेत. असे बरेच वेळेस पहावयास मिळते.
पण जो खरोखर त्या पदाकरीता पात्र खेळाडू असतो त्याचे या कारणामुळे नेहमी नुकसान होते. मी सुद्धा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, आणि मी सुद्धा आज नोकरीपासून वंचित आहे, असे बरेच खेळाडू या बोगस प्रमाणपत्र मुळे नोकरीपासून वंचित आहेत आज किकबॉक्सिंग हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे. आणि या खेळासारखा दुसरा कोणताही लोकप्रिय खेळ नाही आहे. या खेळायला जागतिक दर्जाच्या अनेक मान्यता आहेत. त्यामुळे मी एक पाऊल उचललं आहे की किक बॉक्सिंग या खेळाडूंना योग्य तो न्याय मिळवून देऊन, गुणवंत व गरजू खेळाडूंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. किकबॉक्सिंग हा खेळ खूप नावाजलेला खेळ आहे. आजपर्यंत बरेच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक मिळवलेले आहे. या खेळा मध्ये आपले नाव केले आहे.
परंतु मान्यता नसल्यामुळे हे खेळाडू आज शासकीय नोकरीपासून वंचित आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रात किक बॉक्सिंग चे बरेच अध्यक्ष होऊन गेले परंतु त्या दूरदृष्टी ठेऊन कामे न केल्यामुळे कीव वयक्तिक उदासीनतेमुळे किकबॉक्सिंगच्या खेळाडूंना न्याय मिळवून दिला नाही.  महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदाची कमान माझ्या हाथी आल्यानंतर इथून पुढे मी नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि महाराष्ट्र शासनाने बॉक्सिंग या खेळाचा कुठे तरी विचार करावा आणि आमच्या किक बॉक्सिंग खेळाडूंना न्याय मिळवून द्यावा, तसेच या खेळाला मान्यता द्यावी अशी अपेक्षा निलेश शेलार अध्यक्ष वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिशन यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment