अवकाळी पावसाच्या नुकसानीची तात्काळ मदत द्या.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 20, 2020

अवकाळी पावसाच्या नुकसानीची तात्काळ मदत द्या....

 अवकाळी पावसाच्या नुकसानीची तात्काळ मदत द्या....

पेडगाव येथे आ पाचपुते यांनी केली नुकसानीची पाहणी...

सरकारने तात्काळ मदत द्यावी -आ पाचपुते
 अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात फळबागा ,ऊस ,कपाशी ,कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पण अद्यापही सरकार कडून कोणत्याही प्रकारची मदतीची घोषणा झालेली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना देखील सरकार नुकसानीबाबत गांभीर्याने घेत नाही, पंचनाम्याचा फार्स करण्यापेक्षा तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज या नुकसानीचे पेडगाव भागात आमदार बबनराव पाचपुते यांनी अधिकार्‍यांच्या समवेत पाहणी केली . व या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार पाचपुते यांनी दिले.
आज सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार व इतर अधिकार्‍यांच्या उपस्थिती बैठक झाली या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके ,नगरसेवक बापूसाहेब गोरे ,संतोष खेतमाळीस ,संतोष क्षीरसागर ,शहाजी खेतमाळीस,  भाजप तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे उपस्थित होते
गेल्या आठवड्यात श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला या वादळी अवकाळी पावसात ऊस ,कपाशी ,मका ,तूर ,कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कपाशी पिकाचे तर अतोनात नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी पेडगाव भागात पाहणी दौरा केला या दौर्‍यात तहसीलदार प्रदीप पवार ,गटविकास अधिकारी प्रशांत काळे ,तालुका कृषी अधिकारी पदमनाथ म्हस्के ,संदीप बोदगे ,पेडगाव येथील गणेश पवार  ,युवा नेते   गणेश झिटे , माजी सरपंच दिलीप कराळे ,बशीर काजी ,सागर जाकडे ,नारायण कणसे ,महेश खेडकर ,विजय कराळे , अहमद पिरजादे ,सीताराम मांडगे नांदगुडे चेअरमन आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here