विद्युत तारेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू,शहाजापुर येथील घटना... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 15, 2020

विद्युत तारेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू,शहाजापुर येथील घटना...

 विद्युत तारेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू,शहाजापुर येथील घटना...

नुकसान भरपाई मिळावी, शेतकर्‍याची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
पारनेर तालुक्यातील शहाजापुर येथील संकरित गाई ला मुख्य विद्युत वाहिनीच्या आर्थिंगचा धक्का बसून गाय जागीच ठार झाली. महावितरण कडून उदरनिर्वाहाचे साधनच हिरावल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी रवींद्र भागचंद म्हस्के यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बुधवार दिनांक 15 रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होत असतानाच मुख्य वीज वाहिनीचा मस्के यांच्या संकरित गायला शॉक बसला त्यात गाईचा जागीच मृत्यू झाला. म्हस्के यांनी सुपा येथील महावितरण कार्यालयात जाऊन घटनेची माहिती व निवेदन दिले. परंतु महावितरण’कडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
मस्के यांनी काही दिवसांपूर्वीच 55 हजार रुपये खर्चून संकरित गाय विकत घेतली होती चालू वर्षी अतिवृष्टीमुळे खरीब हंगामातील मूग बाजरी वाया गेली रब्बीतही ज्वारी पीक हातात पडेल की नाही याची शाश्वती नाही. अशातच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन महावितरण हिरावून घेतल्याने आम्ही जगायचे कसे असा प्रश्न या कुटुंबावर निर्माण झाला आहे.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मस्के या कुटुंबावर आर्थिक संकट उभे राहिले आहे या घटनेचा तात्काळ पंचनामा करून ’महावितरण’ने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महावितरण’च्या कार्यालयात मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment