मनपा कर्मचारी पतसंस्था सभासदांची कामधेनू : मुदगल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 16, 2020

मनपा कर्मचारी पतसंस्था सभासदांची कामधेनू : मुदगल

मनपा कर्मचारी पतसंस्था सभासदांची कामधेनू : मुदगल

मयत 17 सभासदांचे 16 लाख 10 हजार 500 माफ करण्याचा निर्णय


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांची कामधेनू आहे. अडीअडचणीच्या काळामध्ये महापालिका कर्मचार्‍यांना मदतीचा हात देण्याचे काम पतसंस्था करीत आहे. तसेच मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी व वैद्यकीय उपचारासाठी मदत करीत असते. पतसंस्थेच्या 30-9-2020 रोजी संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत मयत सभासदाच्या कर्जापैकी 1 लाख रुपयापर्यंतचे कर्जे निर्लेखित (माफ) करण्याचा निर्णय घेतला. असे एकूण 17 सभासदांचे मिळून 16 लाख 10 हजार 500 रुपयांची माफ करण्यात आले. तसेच पांडुरंग वैराळ यांच्या दुर्धर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी 35 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिली.

मयत सभासद शंकर भागानगरे, रघुनाथ घोरपडे, मच्छिंद्र शिंदे, संजय गायकवाड, राजश्री वाणे, भरत छजलानी, नामदेव गाडवे, सिमॉन कसबे, कैलास सातपुते, मधुकर शिंदे, वेणू साठे, संजय उमाप, संतोष घोरपडे, सतीश गांगुर्डे, सुरेश शिंदे, चंद्रकांत वाघमारे, लक्ष्मी नाथा शिंदे या मयत सभासदांने घेतलेल्या कर्जापैकी सुमारे 1 लाख रुपयांची निर्लेखित (माफ) करण्यात आल्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
     यावेळी चेअरमन बाबासाहेब मुदगल, व्हा. चेअरमन विकास गीते, संचालक सर्वश्री जितेंद्र सारसर, सतीश ताठे, श्रीधर देशपांडे किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार, कैलास भोसले, प्रकाश आजबे, अजय कांबळे, नंदा भिंगारदिवे, चंद्रकला खलचे, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here