ठाकरे सरकारने जनतेचे जगणे अवघड केलेय ः धस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 15, 2020

ठाकरे सरकारने जनतेचे जगणे अवघड केलेय ः धस

 ठाकरे सरकारने जनतेचे जगणे अवघड केलेय ः धस

आष्टीत लाक्षणिक उपोषण संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः राज्यातील ठाकरे सरकारने सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे अवघड केले आहे.उध्दवा अजब तुझे सरकार ,अजब कारभाराला जनता वैतागली असल्याचा आरोप माजी जि.प.सदस्य देविदास धस यांनी केला.
भाजपाच्यावतीने आज संपूर्ण राज्यात मंदिरासमोर लक्षाणिक उपोषण करण्यात आले.आष्टी येथील शनि मंदिरासमोर सकाळी  भाजपाचे   उध्दवा दार उघड  हे अंदोलन माजी जि.प.सदस्य देविदास धस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले
पुढे बोलतांना धस म्हणाले की,या सरकाने राज्यातले बार चालु केले पण मंदिर,मज्जिद बंद ठेवले आहे.हे सरकार कायम सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्कील केले आहे.आगोदरच लोकांचे कोरोनाने कंबरडे मोडले असल्याचा धस यांनी केला.यावेळी अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी रंगनाथ धोंडे,नगराध्यक्ष भारत मुरकुटे, उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर ,सभापती शेख शरीफ, ड.अविनाश निंबाळकर ,मनोजपाटील  सुरवसे,निलेश होनकसे,अनंतदेवा जोशी,बब्बुभाई आतार,प्रविण कदम,बबन कदम आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here