व्यवहारे, कोरडेंनी लिलावाची बनावट प्रक्रिया का राबवली? ः शहाणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 23, 2020

व्यवहारे, कोरडेंनी लिलावाची बनावट प्रक्रिया का राबवली? ः शहाणे

 व्यवहारे, कोरडेंनी लिलावाची बनावट प्रक्रिया का राबवली? ः शहाणे

                                 शहाणे यांना जीवे मारण्याची धमकी!

सैनिक बँक प्रकरणात बँक पदाआधिकारी  हे आमचे नातेवाईक असून आमच्या नातेवाईकांची नावे घेऊ नका अन्यथा जीवे मारू अशी धमकी पुरषोत्तम शहाणे यांना अज्ञात व्यक्तिकडून देण्यात आली असून तशी फिर्याद बुधवारी (21) सूपा पोलीसांत शहाणे यांनी दिली आहे.

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः व्यवहारे, कोरडे यांनी संगनमताने बोगस जमीन विक्री केली असल्याचे सहकार खात्याला व पोलिसांना निदर्शनात आल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे  त्यामुळे व्यवहारे, कोरडे यांनी लीलावाची प्रक्रिया बनावट का राबवली याचे स्पष्टिकरण द्यावे असे आवाहन पुरुषोत्तम शहाणे यांनी केले आहे सैनिक बँकेच्या अधिकारी व चेअरमन यांनी पुरुषोत्तम  शहाणे यांच्या मालमत्तेचा लिलाव बनावट करून त्यांची फसवणूक केल्याचा नुकताच  पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शिवाजी व्यवहारे ,संजय कोरडे, संतोष भनगडे यांनी सभासदांमध्ये व खातेदार मध्ये   स्वतःची  प्रतिमा उजाळ व्हावी या साठी वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आणले असल्याचा आरोप शहाणे यांनी केला आहे .
        त्यावर पुरुषोत्तम शहाणे यांनी स्पष्टीकरण दे सांगितले की माझ्यावर सैनिक बँकेची न्यायालयात किंवा पोलिसात कसलीही तक्रार नाही.शहाणे कुटुंबातील एका व्यक्तिबरोबर  बँक अधिकारी यांनी संगनमत करून न्यायालयात तडजोड का केली? न्यायालयात तडजोड झाली असताना  तारण नसलेली व संबधित जागेचे गहाण खत नसताना  वडील पार्जित मालमत्तेचा कोणत्याही वारसाना कल्पना न देता नियमबाह्य, बनावट लीलाव का केला?मालमत्ता लीलाव केल्यास त्या खात्याला ( ओ टी एस) सूट देता येत नाही असे परिपत्रक असताना रुपये 30 लाख रुपये सूट कोणत्या नियमात दिली याचा ही खुलासा कोरडे यांनी करावा.76 लाखाचा लीलाव दडपण्यासाठीच सूट दिली असल्याच्या गौप्यस्फोट शहाणे यांनी केला आहे. तसेच बँकेने  लीलाव पारदर्शक केला असेल,व पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला असेल तर माझ्यावर आब्रूणुकसानिचा दावा दाखल करावाच असे आवाहन पुरषोत्तम शहाणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here