काँग्रेसची शेतकरीविरोधी जुलमी काळ्या कायद्याविरुद्ध केंद्र सरकारविरोधात सह्यांची मोहीम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 23, 2020

काँग्रेसची शेतकरीविरोधी जुलमी काळ्या कायद्याविरुद्ध केंद्र सरकारविरोधात सह्यांची मोहीम

 काँग्रेसची शेतकरीविरोधी जुलमी काळ्या कायद्याविरुद्ध केंद्र सरकारविरोधात सह्यांची मोहीम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः जामखेड तालुका काँग्रेस कमिटी व अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस, काँग्रेस च्या सर्व फ्रटल च्या वतीने केंद्र सरकारने शेतकरीविरोधी आणलेल्या काळ्या कायद्याविरोधात सह्यांच्या मोहिमेला कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड  येथे  शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे समन्वयक राहुल उगले यांनी सांगितले की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, किरण काळे, युवक चे सोमेश्वर दिवटे,निरीक्षक माणिकराव मोरे, जामखेड तालुकाध्यक्ष शाहजी राजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये प्रत्येक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जुलमी अशा काळ्या कायद्याच्या विरोधात मोदी सरकारच्या धोरणाविरुद्ध सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेचा जामखेड येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव सुनील शिंदे, युवक काँग्रेसचे शिवराज घुमरे,जिल्हा सहसचिव तात्या काळे, ता.उपाध्यक्ष कुंडल राळेभात, नगरसेवक अर्शद शेख,अल्पसंख्यांक काँग्रेस तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, शहर काँग्रेसचे अशोक निमोणकर, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष भागिनाथ उगले,अमोल सदाफुले,युवा नेते विंक्रत अब्दुले, शहराध्यक्ष फैय्याज कुरैशी, विशाल डुचे,सेवा दलाचे राजु पाचारे, दादा साठे, विदयार्थी काँग्रेस चे बळीराम पवार,सूरज वाघमारे,अक्षय मोरे,शुभम तांबे,अंकुश मुसळे, अनिकेत जाधव ,आदित्य,  गीते ,प्रीतम ढगे, चेतन फुंदे ,दीपक थोरे, गालिब कुरेशी, सद्दम सय्यद व युवक काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment