अरणगाव रोडवरील खड्ड्यात रोपे लावून ‘मनसे’ची गांधीगिरी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 17, 2020

अरणगाव रोडवरील खड्ड्यात रोपे लावून ‘मनसे’ची गांधीगिरी !

 अरणगाव रोडवरील खड्ड्यात रोपे लावून ‘मनसे’ची गांधीगिरी !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नुकतेच काम झालेल्या नगर-दौंड महामार्गावरील (अरणगाव रोड) विजयनगर ते व्हिआरडीई गेट पर्यंतचा रस्ता तसाच सोडून देण्यात आला असून, अपघाताला कारणीभूत ठरणार्या रस्त्यावरील खड्डयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने झाडांची रोपे लाऊन गांधीगिरी करुन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भूतारे, अनिकेत जाधव, ओमकार काळे, माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव शेळके, मारुती विटेकर, समीर शेख, संदिप झरे, सागर गायकवाड, सिराज शेख, गणेश शिंदे, अमोल बोरुडे, सिध्दार्थ लोखंडे, अर्जुन गायकवाड, सिध्दार्थ उकांडे, नितीन कुसळकर, विजय चौधरी, शुभम साबळे, प्रविण कर्डिले आदि सहभागी झाले होते.
नगर-दौंड महामार्गाचे अत्यंद दर्जेदार पध्दतीने काम करण्यात आले आहे. मात्र अरणगाव जवळील येथे विजयनगर ते व्हिआरडीई गेट पर्यंतचा रस्ता संबंधीत ठेकेदाराने बनवला नाही. रस्ता तसाच पडून राहिल्याने पावसाने रस्त्याचे अजून दुरावस्था झाली आहे. नादुरुस्त रस्त्याचे अंतर मोठे असून, या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तर स्थानिक नागरिकांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले होते, तरी या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. येत्या दहा दिवसात सदर रस्त्याचे काम हाती न घेतल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता नगर-दौंड महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here