अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, शेतकर्‍यांना सावरण्याची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 17, 2020

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, शेतकर्‍यांना सावरण्याची गरज

 अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, शेतकर्‍यांना सावरण्याची गरज

शासनाने पिक पहाणी करून पंचनामे करावे...                                                                    बंद काळात कोरोना साथीने सात ते आठ महिने पछाडले असता,आता तर नैसर्गिक आपत्ती,दैनंदिनी होत असलेल्या पाऊसामुळे शेतकरयांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले असुन,त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी,त्यांना सावरण्याची गरज आहे.त्वरीत शासनाने पिक पहाणी करून पंचनामे करावे,तसेच संबधितांना लवकरात लवकर मदतीची घोषणाही करावी.अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे
दत्तात्रय शिंदे (रासप नेवासे तालुका अध्यक्ष)

नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः दैनंदिन होत असलेल्या पावसामुळे तसेच सात ते आठ महिने उलटून सुद्धा कोरोना साथीच्या महामारीत सर्वांत जास्त नुकसान हे शेतकरी वर्गाचे झाले असुन, एकीकडे कोरोना आजाराची भिती,बाजार बंदीमुळे शेतमालास भाव नाही, शेतीजोड व्यवसाय पुर्णपणे बंद पडले आहेत.तसेच दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पिके धोक्यात गेल्याने आतोनात नुकसान झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत असता, या शेतकरी वर्गास सावरण्याची गरज आहे.                                            
या जगाच्या पोशिंद्याने कोरोना साथीच्या काळात कुठल्याच बाबतीत कुणालाही उपाशी राहू दिले नाही,पण आतातर आज या महामारीत तसेच अतिवृष्टीमुळे या शेतमाल पिकवणारयांसच उपाशी रहाण्याची वेळ आली असुन जास्तीत जास्त त्रास सहन करावा लागतो आहे.
ग्रामीण भागात जरीही कोरोना साथीबाबत प्रभाव कमी होत असता दिसुन येत असले तरीही या नैसर्गिक प्रकोपात तर शेतकरी वर्गाबाबत दिवसेंदिवस अडचणी वाढत असता, पिकाबाबत होत असलेली नासाडी,कापुस तुर,सोयाबीन,बाजरी,कांदा,उस,याबाबत प्रमाणापेक्षाही नुकसान झाले असुन याबाबत सरकारने पिक पहाणी करून पंचनामे करून,मदत करावी अशी मागणीही होत आहे.
तसे पहाता याबाबत कुठल्याच बाबतीत ठोस उपाययोजना राज्यसरकार तसेच केन्द्रसरकारकडुन होत नसल्याने शेतकरयांत अस्वस्थता निर्माण झाली असुन मनोबल व धैर्य वाढविण्यासाठी आतातरी याबाबत लक्ष द्यावे.
संबंधितांनी पिकांच्या होत असलेल्या नुकसानीची  पहाणी करून पंचनामे करावे,लवकरात लवकर जाहीर मदतही करावी.अशी आशा या सर्वसामान्य शेतकर्‍यांना शासकीय यंत्रणेतुन सरकारने घोषीत करावी.असा सर्व या शेतकरी बांधवांतुन एकच सुर निघत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here