‘साईनगर’ भविष्यात आदर्शवत होईल ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 17, 2020

‘साईनगर’ भविष्यात आदर्शवत होईल ः आ. जगताप

 ‘साईनगर’ भविष्यात आदर्शवत होईल ः आ. जगताप

सारसनगर चिपाडे मळा येथे ‘साईनगर’ नामफलकाचे अनावरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आज नगर शहरात चांगल्या औद्योगिकीकरण व चांगल्या वातावरणामुळे नागरी वसाहत वाढत आहेत.  शहराचा होत असलेला विस्तार ही चांगली गोष्ट असली तरी या वसाहतींना सुविधा देणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. त्यामुळेच आपण या भागातील मुलभूत सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत. तसेच प्रभागाचे नगरसेवकही मनपाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देतील. नागरिकांनीही आपल्या कामासाठी पाठपुरवा केला पाहिजे. आज ‘साईनगर‘ नामकरण झालेली वसाहत भविष्यात आदर्शवत होईल, असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
सारसनगर चिपाडे मळा येथील नवीन वसाहतीस ‘साईनगर’ असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी फलकाचे अनावरण आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे, शकिल शेख, अक्षय इधाते, भरत सुरवसे, अक्षय शिदोरे, रामेश्वर घोडके, बबनराव नांगरे, गोवर्धन मेहेत्रे, आदिनाथ रांधवणे उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, या भागाचा नगरसेवक म्हणून या भागातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी तत्पर आहोत. नवीन वसाहतीचे प्रश्न नियोजनबद्ध सोडविण्याचा प्रयत्न करु. येथील नागरिकांच्या मदतीने या भाग विकसित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जगतापांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात विकास कामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here