त्रिदल सैनिक सेवा संघाची कार्यकारिणी जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 17, 2020

त्रिदल सैनिक सेवा संघाची कार्यकारिणी जाहीर

 त्रिदल सैनिक सेवा संघाची कार्यकारिणी जाहीर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यात त्रिदल सैनिक सेवा महासंघ (महा) या आजी, माजी सैनिक व पॅरामिलीटरी  संघटनेची तालुका स्तरीय शाखा 26 जुलै रोजी सुरू करण्यात आली व त्रिदल महासंघ चे अध्यक्ष श्री.संदीप लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. श्री. विश्वनाथ लामखडे - अध्यक्ष,बाबाजी बढे- सचीव, मंगेश ढवळे- सहसचीव, श्री. संदीप तांबे- खजीनदार, श्री गणेश तांबे, संदेश ढवळे- उपाध्यक्ष, राजेश साबळे- कार्याध्यक्ष, संतोष औटी- उपकार्याध्यक्ष, दत्तात्रय ढुस, मच्छींद्र उबाळे- तालुका संघटक, उत्तम गारकर, वेताळ बापू, भरत तांबे, संजय वाकचौरे, नरसाळे रावसाहेब, शांताराम कारखीले-अध्यक्ष राळेगण थेरपाळ शाखा .मोहन मगर, संपत पवार- संपर्क प्रमुख, रासकर, किशोर सोमवंशी, संतोष चौरे, दिनकर येनारे, दिवटे,लंके, व पारनेर तालुक्यातील माजी सैनिक व आम्ही सर्व जण तन, मन, धनाने संघटना मजबूती साठी खुप प्रयत्न करत आहेत. आता पर्यंत नारायनगव्हान, निघोज, कोहोकडी, बाबुर्डी, वाघुंडे, पुनेवाडी, पिंपळगाव रोठा,   व राळेगण थेरपाळ येथील तिन समस्या  मध्यस्थीने यशस्वी रित्या सोडवल्या.
व भविष्यात लगड यांच्या नेतृत्वाखाली काम केले जाणार आहे व सैनिकांवर होनारे खोटे गुन्हे, गावगुंडांन पासुन होनारा त्रास, सरकारी ऑफिस मधे होनारी हेळसांड, रोखण्यासाठी संघटना बांधिल राहणार आहे कोर्ट कचेरी करुन व कोर्ट कचेरी न करता शेती चे वाद, रस्ता, सैनिकपति पत्नीच्या मधे आलेले वितुष्ट, यामध्ये मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करत राहु असे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
त्यामुळे तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिकांनी संघटने मध्ये सामील होऊन  आपले असणारे प्रश्न  मांडावेत  त्यासाठी आपण सर्वतोपरीने प्रयत्न करू व भविष्यामध्ये  संघटना वाढीस नेण्यासाठी  सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे  यासाठी तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिकांनी संघटित होऊन एकत्र काम करावे असे सचिव बाबाजी बढे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment