आ. संग्राम जगताप व आयुक्तांकडुन समस्यांची दखल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

आ. संग्राम जगताप व आयुक्तांकडुन समस्यांची दखल!

 आ. संग्राम जगताप व आयुक्तांकडुन समस्यांची दखल!

बुरूडगावकरांच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर यंत्रणेला जाग.


अहमदनगर (नगरी दवंडी/प्रिंतनिधी) ः बुरूडगाव मधील कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या समस्या, शहरातील सांडपाणी, मैलमिश्रित पाणी, सीनानदीत सोडल्यामुळे नापीक झालेली शेती, हॉस्पिटलमधील कचरा व  मेलेल्या जनावरांचे अवशेष मास्क कचरा डेपोत टाकण्यात आल्यामुळे येत असलेली दुर्गंधी, मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीवास होत असलेला धोका, कचर्‍यावर कुठलेही प्रक्रिया होत नसल्यामुळे सर्वत्र पसरलेली दुर्गंधी यामुळे बुरूडगावकरांनी आ.संग्राम जगताप व आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना पत्र देऊन कचरा डेपोत गाड्या बंद करण्याच्या दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन आयुक्त व आमदारांनी या परिसरात भेट देऊन समस्यांची माहिती घेऊन हा प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले.

बुरुडगावकरांनी या प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आ.जगताप यांनी कचरा अडवू नका, आपण मनपाच्या माध्यमातून बुरुडगावकरांचे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर लगेच बुरुडगाव येथील कचरा डेपोचे आ. संग्राम जगताप, आयुक्त श्रीकांत मायकलवार, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, बांधकाम विभागप्रमुख सुरेश इथापे, माजी सरपंच बापू कुलट, उपसरपंच खंडू काळे, जय मातादी दुध संघाचे चेअरमन नवनाथ वाघ, जालिंदर कुलट, राधाकिसन कुलट, निलेश शेळके, अमित जाधव, मोहन काळे आदींनी पाहणी करुन महापालिकेत बैठक घेऊन तोडगा काढला.
मनपासमोर कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात यावी, बुरुडगावला पिण्याचे पाणी देण्यात यावे, कचरा गाड्या झाकून आणण्यात याव्या, कचरा डेपोवरील रस्त्याचे काम करण्यात यावे, सीनानदीवरील पुलाचे काम मार्गी लावावे, स्ट्रीट लाईट बसविण्यात यावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा व कचरा डेपोवर औषध फवारणी महापौर व आयुक्तांसमोर करण्यात आल्या. यावर चर्चा होऊन हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने त्वरित मार्गी लावण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन बुरुडगावकरांना महापालिकेच्यावतीने देण्यात आले.यावेळी आ. संग्राम जगताप पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांना बुरुडगावकरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगितले होते. याबाबत त्यांनी पाठपुरावा करुन बुरुडगावकरांना महापालिकेच्या माध्यमातून लेखी आश्वासन देण्यासाठी प्रयत्न केला. बुरुड्यावमधील कचरा डेपोचा प्रश्न गंभीर स्वरुपाच असून, तो सुटण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे. गेल्या 5 वर्षामध्ये  राज्यशासनाच्या माध्यमातून येथील विविध विकास कामे मार्गी लावली आहे.
नाबार्ड अंतर्गत सीनानदीवरील पुलाचा 6 कोटींचा व कचर्‍या डेपोकडे जाणार्‍या रस्त्याच्या निधीसाठी मागणी केली असून लवकरच निधी मंजूर केला जाईल. तसेच बुरूडगाव परिसरामध्ये स्ट्रीट लाईटची कामे काही प्रमाणात सुरु आहेत, उर्वरित कामे लवकरच मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. महापौर वाकळे म्हणाले की, येथील कचरा डेपोचा प्रश्न समजावून घेऊन बुरुडगावकरांना लवकरच पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. लवकरच नवीन लाईनही टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच कचर्‍यावर औषध फवारणी करण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त केला जाणार आहे. या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे. मनपाच्यावतीने बुरुडगावकरांना लेखी आश्वासन देऊन विश्वास दिला आहे. बुरुडगावकरांच्यावतीने बोलताना नवनाथ वाघ म्हणाले की, सीनानदीच्या मैलमिश्रीत पाण्यामुळे व नगर शहराच्या कचर्‍यामुळे बुरुडगावकर हैराण झाले आहे. यामुळे बुरुडगावच्या विकासाला खीळ बसली आहे. आमच्या भागामध्ये कुठलेही नवीन बांधकाम होत नाही. कुठलाही नवीन माणूस राहण्यास येत नाही. मोठ्या प्रमाणात समस्या असल्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. गेली दहा-बारा वर्षांपासून मनपाने यावर कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. बुरूडगावकरांच्या सहनशीलतेचा वापर करुन घेतला. आम्हाला फक्त महापालिकेच्यावतीने आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात ती अंमलात आली नाही. आता दिलेले आश्वासन लेखी स्वरुपाचे आहे. तसेच आ. संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीमुळे हे काम मार्गी लागेल असेल वाटते. याबद्दल सर्व अधिकारी व पदाधिकार्‍यांचे आभार मानतो व दिलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करावी असेही नवनाथ वाघ म्हणाले.

No comments:

Post a Comment