प्रभाग 5 मध्ये विकासकामांचा तडाखा ः महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

प्रभाग 5 मध्ये विकासकामांचा तडाखा ः महापौर वाकळे

 प्रभाग 5 मध्ये विकासकामांचा तडाखा ः महापौर वाकळे

भाजपा नगरसेवकांकडुन प्रश्नांची सोडवणुक!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग पाच मध्ये नागरिकांनी विश्वास ठेवून 4 नगरसेवक भाजपचे निवडून दिले त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी या प्रभागातील नगरसेवक मनोज दूलम भैया गंधे आशाताई कराळे सोनाबाई शिंदे यांनी या प्रभागांमध्ये विकासाचा तडाका लावला आह.े नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे काम वेळोवेळी नगरसेवक करत आहेत. खर्‍या अर्थाने प्रभाग पाचमधील नागरीकांना मूलभूत सुविधा देण्याचे काम भाजपचे नगरसेवक करत आहे. असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
प्रभाग क्रमांक पाच मधील श्रमिकनगर परिसरामध्ये नागरिक  दलित वस्ती निधीमधून बंद पाईप गटार रस्त्याचे काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉकच्या कामाचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक मनोज दुलम, उदय कराळे, सतीश शिंदे, दगडू मामा पवार, सागर जेटला, करण कराळे न्यालपेल्ली ताई, महेश म्याना, रमेश रोल्ला सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
महापौर बाबासाहेब वाकळे पुढे म्हणाले या परिसरातील नागरिकांसाठी मनोज दूलम यांनी कायम स्वतःला त्यांच्या सेवेसाठी झोकून दिले आहे. नागरीकांचे कोणतेही प्रश्न असो ते सोडवण्यासाठी ते कायम अग्रेसर असतात तसेच इतर नगरसेवकांचीही त्यांना मोठ्या प्रमाणावर सात देत असतात. यापुढेही हा प्रभाग आदर्श प्रभाग करण्यासाठी हे सर्व नगरसेवक तत्पर असतील असे सांगितले.याप्रसंगी मनोज दुलम म्हणाले नगरसेवक हे पद नागरिकांच्या सेवेसाठी असते. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असणार्‍या सुविधा पुरवण्यासाठी नगरसेवकाने प्रयत्न करून निधी मंजूर करून प्रभागांमध्ये अनेक प्रकारच्या विकास कामासाठी झटले पाहिजे. नागरिकांना उत्तम सुविधा कशा प्रकारे देता येतील. नागरिकांसाठी आम्ही 24 तास उपलब्ध असतो. कोणाची कोणती अडचण असो निसंकोचपणे आमच्याकडे मांडावी ती अडचण सोडवण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.


No comments:

Post a Comment