राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 5, 2020

राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा संपन्न
राम मंदिर, हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक ः नरेंद्र मोदी

  अयोध्या : राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. राम मंदीराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. अयोध्येत श्रीराम मंदिर भुमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. राममंदीराचा शिलान्यास आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. अयोध्येचं अर्थतंत्र बदलेल, अनेक संधी उपलब्ध होतील. संपूर्ण जगातील लोक प्रभु रामाचं दर्शन घेण्यासाठी येतील. सर्वोच्च न्यायालयाने सर्वांच्या भावनांचा आदर राखत निर्णय दिला. ज्याप्रमाणे मावळ्यांनी छत्रपतींना साथ दिली, समाजातील सर्व वर्गाने गांधीजींना पाठींबा दिला त्याप्रमाणे आपण सर्वांनी मिळून राम जन्मभुमीचं कार्य पार पाडल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
     जगभरातील रामायणांचा यावेळी पंतप्रधानांनी आवर्जुन उल्लेख केला. मुस्लिमबहुल इंडोनेशियातही रामाचे पूजन केले जात असल्याचे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी हे सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यांनी हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले आणि पूजा-आरती केली. त्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. भूमिपूजन समारंभात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केले.पीएम मोदी यांनी भगवान श्रीरामलल्लाला विराजमान केले. पंतप्रधान मोदी दुपारी 12.40 वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी केला. राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात चांदीचे फावडे आणि चांदीची कणी वापरण्यात आली आहे. त्यानंतर अयोध्येत भगवान राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रम झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी मोदी हे सकाळी अयोध्येत पोहोचले. त्यांनी हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले आणि पूजा-आरती केली. त्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. भूमिपूजन समारंभात सहभागी झाले आहेत.  
   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केले. पीएम मोदी यांनी भगवान श्रीरामलल्लाला विराजमान केले. पंतप्रधान मोदी दुपारी 12.40 वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी केला. अयोध्येत भगवान राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रम सुरु झाला आहे. राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात चांदीचे फावडे आणि चांदीची कणी वापरण्यात आली.

No comments:

Post a Comment