शिवसेनेचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 5, 2020

शिवसेनेचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड

शिवसेनेचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड


अहमदनगर - शिवसेना उपनेते, माजी मंत्री व माजी आमदार अनिल राठोड (वय 70)  यांचे बुधवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, 3 मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.
अनिल राठोड यांना काही दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वर उपचार सुरु असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले .
नगर जिल्ह्यात शिवसेनेचे ओळख अनिल भैय्या यांच्या नावाने होती. जिल्ह्यात शिवसेनेच्या जडणघडणीत अनिल भैय्यांचा मोठा वाटा होता.अनिल राठोड ‘भैया’ नावाने सर्वत्र प्रसिद्ध होत. भैया हे सलग 5 वेळा नगर शहर मतदार संघाचे आमदार व काही काळ मंत्री देखील होते.


No comments:

Post a Comment