स्थानिक सहकारी बँकानी सभासदांना कोविड कर्ज उपलब्ध करुन द्यावे ः बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 31, 2020

स्थानिक सहकारी बँकानी सभासदांना कोविड कर्ज उपलब्ध करुन द्यावे ः बोज्जा

स्थानिक सहकारी बँकानी सभासदांना कोविड कर्ज उपलब्ध करुन द्यावे ः बोज्जा
नगरी दवंडी /प्रिंतनिधीअहमदनगर ः सध्या कोविड विषाणूने थैमान घातल्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडली असून लहान व्यापार्‍यापासून मोठे व्यापारी पर्यंत व्यवसाय करणे जिकरिचे झाले आहे अशा परिस्थितीत स्थानिक नगर अर्बन बँक,  मर्चंट बँक व शहर सहकारी बँक यांनी त्यांच्या सभासदाना कोविड कर्ज उपलब्ध करून दयावे अशी मागणी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकानवये केले.
सध्या छोटे छोटे व्यापारी यांना कोणी वाली नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन काळा पासून आज पावेतो यांचे उत्पन्न बंद झाल्यामुळे भांडवल संपले   आहे अशा परिस्थिती मध्ये यांना आर्थिक सहाय्य केल्यास हे छोटे व्यापारी पुन्हा उभारी घेतील.  केंद्र सरकार ने कोविड कर्ज उपलब्ध करून दिले आहे परंतु त्याचा फायदा मोठे व्यावसायिक व नोकरदारांना होत आहे त्याचा कोणताही फायदा लहान व्यावसायिकाना होत नाही.  तसेच महाराष्ट्र शासनाने ही या लहान व्यावसायिका साठी कोणतीही आर्थिक योजना जाहीर केल्याचे दिसून येत नाही.  मध्यंतरी पंडित दिन दयाल पतसंस्थेने सध्याच्या परिस्थिती चा विचार करून व्याज दर कमी केले ही अभिनंदनीय गोष्ट आहे, गरजवतुना छोटे कर्ज उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे.
नुकतेच पुणे येथील जनता सहकारी बँक व इतर सहकारी बँकानी कोविड कर्ज योजना उपलब्ध केली असून अत्यंत कमी व्याजदरा मध्ये छोटया व्यावसायिकाना कर्ज उपलब्ध करून देत आहे याच धर्तीवर स्थानिक सहकारी बँकानी सध्याचे गंभीर परिस्थिती चा विचार करून आप आपल्या सभासदाना कमी व्याजदराने व विना जमीनदार कोविड कर्ज योजना सुरु करून कमीत कमी कागदपत्रे स्वीकारून उपलब्ध करून दयावी अशी मागणी श्रीनिवास बोज्जा यांनी केली.
या बाबत सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्र देऊन संपूर्ण महाराष्ट्रतील सहकारी बँकानी कोविड कर्ज योजना उपलब्ध करून दयावी असे आदेश करावा   असे निवेदन मेल द्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment