शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे रोटरी कोव्हीड सेंटर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 31, 2020

शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे रोटरी कोव्हीड सेंटर

अहमदनगर महानगरपालिका संचलित तसेच अहमदनगर रोटरी क्लबच्या सहकार्याने
       शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे रोटरी कोव्हीड सेंटर
             मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते शुभारंभ
नगरी दवंडी /प्रिंतनिधीअहमदनगर ः अहमदनगर शहरात अहदमनगर महानगरपालिका संचलित तसेच अहमदनगर रोटरी क्लबच्या सहकार्याने शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे 100 बेडसचे सुसज्ज असे रोटरी कोव्हीड सेंटर उभारण्यात आले. या कोव्हींड सेंटरचे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी उदघाटन केले. यावेळी  मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप, मा.आयुक्त श्री. श्रीकांत मायकलवार, शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. सातारकर, रोटरी क्लब ऑफ मिड टाऊनचे अध्यक्ष मा.श्री.क्षितीज झावरे, सचिव मा.श्री.दिगंबर रोकडे, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष श्री.प्रसन्ना खाजगीवाले, सचिव मा.श्री. ईश्वर बोरा, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मेनचे अध्यक्ष मा.श्री.अमित बोरकर, सचिव मा.श्री.पुरूषोत्तम जाधव, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीचे अध्यक्षा मा.श्रीमती गिताताई गिल्डा, सचिव मा.श्रीमती देविका रेले, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटीग्रीटी चे अध्यक्ष मा.श्री.रफिक मुन्शी, सचिव मा.श्री.सुयोग झंवर,  मा.डॉ.श्री.सतिष राजूरकर, मा.श्री.शिरीष रायते, मा.श्री.प्रमोद पारिख, मा.श्री.पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्हणाले की, सदरचे कोव्हीड सेंटर मध्ये रूग्णांना सर्व सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहे.  उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांना उत्तम प्रकारची जेवणाची सोय देखील करण्यात आलेली आहे् सदर कोव्हीड सेंटर मध्ये देण्यात येणा-या जेवणाचा माझ्यासह मा.आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी देखील आस्वाद घेतलेला आहे् सदर कोव्हीड सेंटरमध्ये डॉर्क्टर्स व नर्सेस यांचे वेगळे कक्ष तयार करण्यात आले आहे् रूग्णांना योग्य प्रकारचे उपचार मिळण्यासाठी डॉक्टर्स व नर्सेस यांचे विशेष पथक देखील तयार करण्यात आलेले आहे. या पथकामार्फत रूग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा मार्फत सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे. शक्यतो 60 वर्षावरील वृध्द नागरिकांनी व 10 वर्षाच्या आतील लहान मुलांनी घरातच रहावे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. आवश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. आपल्या पासून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कोरोनामुक्त नगर शहर करण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करूया आणि कोरोनाच्या प्रार्दुभाव रोखूया जे नागरिक कोरोना रूग्णांच्या संपर्कात आले असल्यास त्यांनी स्वॅब तपासणीसाठी रामकरण सारडा वसतिगृह सिव्हील हडको येथे जावे. तसेच मनपाचे संपूर्ण सहकार्य या सेंटरला राहील असेही ते म्हणाले.  
प्रास्ताविकात रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे म्हणाले, अत्तापर्यंत ज्ञानदान करणारी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची ही वास्तू आता करोना बाधितांना जीवनदान देणार आहे. महापालिकेच्या व पाच रोटरी क्लबच्या सहकार्याने केवळ पाच - सहा दिवसात हे रोटरीचे मोफत कोविड उपचार सेंटर सुरु झाले आहे. या सेंटर मधून 120 रुग्णाना चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी रोटरीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीतून मोफत रोटरी कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. सर्व दैनदिन जीवनावश्यक वस्तूंबरोबरच आयुष काढा, शासना निर्देशानुसार प्रत्येक मजल्यावर ऑक्सिजन सिलेंडर्सचीही व्यवस्था आहे. रूग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी ध्यानधारणा, अध्यात्मिक संगीत, दररोजचे वृत्तपत्र, आरोग्यपर मनोरंजनाचीही व्यवस्था आहे. करोनाची महामारी संपुष्टात येईपर्यंत हे  कोविड केअर सेंटर सर्वांच्या सहकार्यातून चालू ठेवण्याचा प्रयत्न रोटरीयन्स करणार आहेत. यासठी कोट्यावधी रुपयांची गरज आहे. सर्वांनी या सेंटरला मदत करावी.

No comments:

Post a Comment