लाईफलाईनमध्ये आजपासुन खाजगी कोव्हिड हॉस्पिटल सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 1, 2020

लाईफलाईनमध्ये आजपासुन खाजगी कोव्हिड हॉस्पिटल सुरू

लाईफलाईनमध्ये  आजपासुन खाजगी कोव्हिड हॉस्पिटल सुरू


अहमदनगर- तारकपूर बसस्थानकासमोरील लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये कोव्हिड हॉस्पिटल सुरू होत आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये असंख्य न्यूरो सर्जरी ,स्पाइन सर्जरी ,जनरल सर्जरी ,विषबाधा झालेले रुग्ण, सर्पदंश झालेले रुग्ण ,जळीत रूग्ण ,हाडांच्या असंख्य गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत. सध्या कोरोना या जागतिक महामारीने जगभर थैमान घातले असून अहमदनगर शहरामध्ये असंख्य रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांना  हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही, म्हणूनच सामाजिक बांधिलकी जपत हॉस्पिटल प्रशासनाने कोव्हिड हॉस्पिटल सुरु करण्याचा संकल्प केला आहे. आज दि.1 ऑगस्ट पासून कोव्हिड रुग्णांवरती लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होणार आहे. लाईफ लाईन कोव्हिड हॉस्पिटलचे उद्घाटन महानगर पालिका आयुक्त श्री श्रीकांत मायकल वार साहेब यांच्या हस्ते  झाले असून ,प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे महापौर श्री  बाबासाहेब वाकळे ,विरोधी पक्षनेते  श्री संपत बारस्कर तसेच उपमहापौरमालन ढोणे ेआरोग्य अधिकारी अनिल  बोरगे,  संजय गाडे ,लाईफ लाईन ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष एम. बी. धुमाळ साहेब, डॉ पियुष मराठे ,डॉ मनोज जगदाळे लाईफ लाईन हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ संदीप धुमाळ, हॉटेल सुवर्णम प्राइडचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश धुमाळ, नगरसेवक  गणेश नन्नवरे, नगरसेवक सागर बोरुडे , नगरसेवक सतिश शिंदे आदी उपस्थित होते. लाईफ लाईन हॉस्पिटल हे 50 बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल असून हॉस्पिटलमध्ये 13 बेडसाठी अद्ययावत मशिनरीयुक्त वातानुकूलित आयसीयू असून 3 व्हेंटिलेटर व दोन बायपॅप मशीन आहेत. अद्ययावत वातानुकूलित ऑपरेशन थिएटरही आह.े सुसज्ज स्वतंत्र पुरुष व महिला जनरल वार्ड ,स्पेशल व सेमी स्पेशल रूम आदी सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. नगर शहरातील पहिले व एक मात्र ब्लड स्टोरेज युनिट ही हॉस्पिटलमध्ये आहे. गेल्या सहा महिन्यापासून अहमदनगर शहरातील पहिले व सर्वाधिक रुग्ण पाहणारे फिजिशियन डॉ पियुष मराठे  तसेच  डॉ मनोज जगदाळे हे रुग्णांवर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार करणार आहे अशी माहिती हॉस्पिटलचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ संदीप धुमाळ यांनी दिली.


No comments:

Post a Comment