शिर्डी येथे मोदींच्या सभेसाठी जाण्यासाठी एक ही नागरिक बसेस मध्ये बसण्यास तयार नाही. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, October 26, 2023

शिर्डी येथे मोदींच्या सभेसाठी जाण्यासाठी एक ही नागरिक बसेस मध्ये बसण्यास तयार नाही.

 शिर्डी येथे मोदींच्या सभेसाठी जाण्यासाठी एक ही नागरिक बसेस मध्ये बसण्यास तयार नाही.

शिर्डी येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी नागरिकांनी फिरवली पाठ ! 

नागरिकांन च्या संतप्त प्रतिक्रिया !


जामखेड - 
जामखेड तालुक्यात गाव गावी शिर्डी येथे बहुचर्चित माननीय पंतप्रधान यांचा मेळावा या मिळव्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पाठविलेल्या बसेस परंतु संतप्त नागरिकांनी पाठफिरवली आहे याचे कारण गेली काही वर्षापासून गाजत असलेला मराठा अरक्षण हा विषय अणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण यामुळे मराठा समाजासह धनगर समाजामथ्येही नराजीचा सुर दिसत आहे. त्यातच कष्टकरी वर्ग व सुशिक्षित बेकरी यांच्या सरकारच्या विरोधात अंत्यत तीव्र भावना आहे. नेहमीचेच दसरा मेळावे करून आणी वारंवार देखाव्याचे कार्यक्रम करुन सरकार मराठा आणि धनगर समाजाची दिशाभूल करत आहे. आणि त्याच्या मुलभूत प्रश्नापासून नेहमीच विषयअंतर करण्याचे काम सरकार हे करीत आहे. म्हणून संतप्त नागरिकांनी शिर्डी च्या मेळाव्याकडे रिकाम्या बसेस रवाना केलेल्या आहेत. आणि गाव गावी रिकाम्या बसेस पाठविण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच नेत्यांना प्रस्थापित नेत्यांना गाव बंदी चे आदेश नागरिक करीत आहे. म्हणूनच सर्वत्र पुढाऱ्यांचा निषेध करत गाव बंदी चे फलक लावण्यात आलेले आहे. खरंतर ही एक फार मोठी सामाजिक क्रांती दिसत आहे. जामखेड तालुक्यातील गाव गावी मराठा बांधव अरक्षणसाठी साखळी उपोषणास बसलेले आहेत.

No comments:

Post a Comment