लाठीमाराचे समर्थन करणाऱ्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 2, 2023

लाठीमाराचे समर्थन करणाऱ्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध.

 लाठीमाराचे समर्थन करणाऱ्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा  मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध.

तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन चिकटवले.

तहसीलदार, नायब तहसीलदारांसह जबाबदार अधिकारी कार्यालयात अनुपस्थित...


पारनेर -
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली असताना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे पारनेर तहसील कार्यालय ओस पडले होते.
तहसीलदार,नायब तहसीलदार कार्यालयात अनुपस्थित होते.जालना येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात गेले असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.निवेदन स्वीकारण्यास जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांनी अखेर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निवेदन चिकटवले.
यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,पत्रकार मार्तंड बुचुडे, वकील गणेश कावरे, सेनापती बापट पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रवींद्र पुजारी, तुषार औटी,नंदकुमार दरेकर, कांतीलाल कोकाटे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतिष म्हस्के,रायभान औटी, तुषार ज्ञानेश्वर औटी,संदीप कावरे आदी उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चिकटवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मराठा आरक्षणासाठी जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला.या लाठीमाराचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थन करीत आहेत.ही खेदाची बाब आहे. फडणवीस यांनी लाठीमाराची नैतीक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
दरम्यान, तहसील कार्यालयात तहसीलदार,नायब तहसीलदार अथवा इतर कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने,कार्यकर्त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी गणेश राठोड यांच्याशी संपर्क साधला. राज्यात संवेदनशील परिस्थिती असताना पारनेर तहसील कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याची बाब कार्यकर्त्यांनी राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली.आज,शनिवारची सुट्टी असल्याने अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतील.मात्र ते मुख्यालयातच आहेत.ते निवेदन स्वीकारण्यास येतील अशी ग्वाही राठोड यांनी दिली.मात्र पाऊण तास वाट पाहूनही कोणीही कार्यालयाकडे न फिरकल्याने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निवेदन चिकटवण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर निवेदन चिकटवल्यानंतर,पारनेर येथील एका खासगी कार्यक्रमात उपस्थित असलेलेले मंडलाधिकारी, अव्वल कारकून,कारकून दर्जाचे कर्मचारी तहसील कार्यालयात धावपळ करीत आले.मात्र किमान नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.महसूल प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा यावेळी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यात सध्या 'शासन आपल्या दारी ' योजनेचा मोठा गाजावाजा सुरू आहे.मात्र प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती आहे.महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात महसूल प्रशासनाचे अधिकारी कार्यालयात भेटत नसतील तर सर्वसामान्यांच्या दारी तरी जात असतील का? राज्यात संवेदनशील परिस्थिती असताना महसूल प्रशासन मात्र सुटीच्या मूडमध्ये आहे ही खेदाची बाब आहे. गणेश कावरे, वकील.

No comments:

Post a Comment